ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. १६ - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, लिखित " मन में है विश्वास " या पुस्तकाच्या बोगस काँपी विकताना आज दुपारी दोन जणाना लोणावळा बस स्थानक परिसरातुन अटक करण्यात आली. रामगणेश गजाधर पाल, (वय ३२ वर्ष, राहणार हमराज चौक,पौड रोड, कोथरूड, पुणे) व शैलेन्द इंद्रलाल विश्वकर्मा, (वय २८ वर्ष, राहणार मोहळ चाळ, कोथरूड, पुणे) (दोघेही मूळचे राहणार मध्य प्रदेश) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. राजहंस प्रकाशनचे व्यवस्थापक अमोल काशिनाथ महादम (वय ४४, रा. वडगाव धायरी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर कारवाई करण्यात आली.राजहंस प्रकाशन प्रा.लि. सदाशिव पेठ पुणे, यांचेकडून हे पुस्तकाचे सन २०१६ रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे. सदर पुस्तिकांचे निमिर्ती, वितरक व प्रकाशनाचे सर्व हक्क व अधिकार राजहंस प्रकाशन प्रा.लि या कंपनीस आहे. राजहंस प्रकाशनाचे संचालक व संपादक डॉ. सदानंद बोरसे यांना " मन में है विश्वास " या पुस्तकाचे बनावट छपाई करून पायरेटेड कॉपीची लोणावळा बस स्थानक व परिसरात बाजारपेठेत विक्री करीत असलेबाबत माहिती मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी डॉ. जय जाधव, पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांची भेट घेतली व त्यांचेशी सविस्तर चर्चा केलेनंतर राम जाधव, पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना सूचना व मार्गदर्शन केले. त्या प्रमाणे सपोनि सतिश होडगर व पथक असे लोणावळा शहर बस स्थानक व परिसरात साध्या वेषात टेहाळणी करीत असताना रोडचे कडेस दोन इसम " मन में है विश्वास " या पुस्तकाची प्रति विक्री करीत असताना दिसले, त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे त्याचे ताब्यात असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये " मन में है विश्वास " या पुस्तकाच्या ४४ (पायरेटेड ) डुप्लीकेट पुस्तके मिळून आली असून बाजारात त्याची किंमत ११,०००/- इतकी आहे.
डॉ. जय जाधव, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनप्रमाणे राम जाधव,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण,सपोनि सतिश होडगर,कर्मचारी शंकर जम, सुनिल जावळे, सुनिल बांदल, दत्तात्रय जगताप, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, किरण आरुटे यांनी कामगिरी केली. अमोल महादम यांनी तक्रार दिलेने लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन (पायरेटेड ) डूप्लीकेट पुस्तके आणखीन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत किंवा नाही तसेच पुस्तकाची छपाई करणारे मूळ सूत्रधाराचा पोलीस कसुन शोध घेत आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश अपसुंदे तपास करत आहेत.