शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘मृत्यूंजय’ चिमुरडी आज घरी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 03:36 IST

बारा तासांची हृदयशस्त्रक्रिया आणि त्यानंतर हृदयविकाराचे सहा झटके आल्यानंतरही एका चार महिन्यांच्या लहानगीला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बारा तासांची हृदयशस्त्रक्रिया आणि त्यानंतर हृदयविकाराचे सहा झटके आल्यानंतरही एका चार महिन्यांच्या लहानगीला ‘पुनर्जन्म’ देण्यात परळच्या वाडिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे. आता ती पूर्णपणे बरी झाली असून शुक्रवारी सकाळी तिची तपासणी करून तिला घरी सोडण्यात येईल, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विदिशा असे या मुलीचे नाव असून ती कल्याण येथील विशाखा आणि विनोद वाघमारे या गरीब दाम्पत्याची मुलगी आहे. चार महिन्यांपूर्वी विदिशाचा जन्म याच इस्पितळात झाला होता व गेले दोन महिने तिच्यावर शर्थीने उपचार केले गेले. १४ मार्चला तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. कल्याण येथील गरीब कुटुंबातील विदिशाला जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांतच हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. तिच्या रक्तवाहिनीच्या संक्रमणात अडथळा निर्माण झाला. यामुळे तिच्या शरीरात ६० टक्के आॅक्सिजनची कमतरता भासू लागल्याने तिचे शरीर निळे होत गेल्याचे वाडिया रुग्णालयातील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांनी सांगितले. तसेच, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उपचारांना दिरंगाई झाल्याने फुप्फुसांच्या कार्यातही दोष निर्माण झाला होता. डॉ. पांडा यांनी सांगितले की, तिच्या हृदयावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेला तब्बल १२ तास लागले. त्यानंतर आॅक्सिजनची पातळी नियंत्रित आणण्यासाठी तिला ‘हाय फ्रिक्वेन्सी आॅसिल्लोट्री’ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या फुप्फुसाचा त्रास कमी झाल्यानंतर हे व्हेंटिलेटर काढण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्वी अतिदक्षता विभागात दाखल असताना एक महिना विदिशाची प्रकृती अस्थिर आणि नाजूक होती. त्या वेळी तिला सहा हृदयविकाराचे झटके आले, मात्र तिच्या जगण्याच्या जिद्दीमुळे ती यशस्वीपणे त्या परिस्थितीतून बाहेर पडली, असे डॉ. पांडा यांनी सांगितले. विदिशाच्या प्रकरणात उपचार आणि वेळेचे समीकरण साधणे अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे. विदिशा ५० दिवस अतिदक्षता विभागात होती. त्यातील तब्बल ४० दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.हृदयाचे कार्य पूर्ववत केले‘ट्रान्सपोझिशन आॅफ द ग्रेट आर्टरिज’ हा आजार लहानग्यांमध्ये जन्मत: दिसून येतो. या आजारात हृदयाचे कार्य पूर्णपणे उलटे सुरू असते. या आजाराचे निदान उशिरा झाले की, त्याचा परिणाम इतर अवयवांवर होतो. विदिशाच्या प्रकरणात दीड महिन्यानंतर आजाराबद्दल कळल्यावर १५ दिवस तिची प्रकृती स्थिर करण्यास लागले. तिच्या हृदयास डाव्या बाजूला असणाऱ्या धमन्या उलट्या बाजूला जोडलेल्या होत्या, त्या पूर्ववत केल्या. १४ मार्चला सकाळी ९ च्या सुमारास शस्त्रक्रिया सुरू केली होती आणि रात्री ९-९.३० च्या दरम्यान संपली. - डॉ. बिस्वा पांडा, बालहृदयरोगतज्ज्ञ

१५ मिनिटांनी हृदय धडधडले-विदिशाला हृदयविकाराचा झटका आला त्या वेळी आमच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या वेळेस तब्बल १५ मिनिटे हृदयाचे कार्य सुरू करण्यासाठी डॉक्टरांचा संघर्ष सुुरू होता आणि अखेरीस तब्बल १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर तिचे हृदय धडधडण्यास सुरुवात झाली, असे डॉ. बिस्वा पांडा यांनी सांगितले.दानशूरांनी केला खर्च-विदिशावरील उपचारांचा एकूण खर्च पाच लाख रुपयांच्या घरात होता. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आम्ही मित्र- परिवाराकडून जेमतेम ५० हजार रुपयांची कशीबशी जमवाजमव करू शकलो. पण इस्पितळ प्रशासनाने पुढाकार घेतला आणि दानशूर दात्यांनी बाकीच्या पैशाची व्यवस्था केली. या सर्वांच्या पुण्याईमुळे विदिशा पूर्ण बरी होऊ शकली.- विनोद वाघमारे, विदिशाचे वडील