शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारूनिर्मिती करणारे हात गुंतले श्रमदानात

By admin | Updated: May 23, 2016 04:51 IST

दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई (जि. बीड)दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या या गावकऱ्यांनी केवळ ४५ दिवसांत श्रमदानातून गावचे परिवर्तन घडवून आणले. परिवर्तनाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करून गावठी दारू बनवण्याचे बंद करण्याचा सामूहिक निर्धारही या गावाने केला आहे, हे येथे उल्लेखनीय!राडीतांडा हे ९५० लोकवस्तीचे गाव. गावात एकूण १५२ कुटुंबे राहतात. गेल्या येथील ग्रामस्थ ३० वर्षांपासून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी ऊसतोडीसाठी जातात. गावातील १७ कुटुंबे गावठी दारू बनवतात. या वर्षी भीषण दुष्काळाच्या स्थितीमुळे ऊसतोडीसाठी कुठूनही बोलावणे आले नाही. अशा स्थितीत उदरनिर्वाह करायचा कसा? या मुख्य समस्येचे निराकरण करण्यासाठी गावचे परिवर्तन हेच विकासाकडे नेऊ शकते, या उद्देशाने ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे, ग्रामसेवक विनोद देशमुख, यांनी ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. श्रमदानाच्या माध्यमातून गावात जलक्रांतीचे विविध कामे होऊ लागली. गेल्या ४५ दिवसांत ग्रामस्थांनी गावाचा संपूर्ण कायापालटच करून दाखविला.ग्रामस्थांनी श्रमदानातून गायरानात १५ फूट लांब व दोन फूट रूंद व दोन फूट खोल असे ५,२०० समान समपातळी चर खोदले. या प्रत्येक चरामध्ये एका पावसात ९०० लिटर पाणी जमिनीत मुरते. एकदा पाऊस पडला तर ५,२०० चराच्या माध्यमातून ४६ लाख ८० हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. गावातील ११ विहिरी व २८ विंधन विहिरींचे पुर्नभरण करण्यात आले आहे. गावातील ९४ हेक्टरवर बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. सांडपाणी मुरवण्यासाठी शोषखड्डेही तयार करण्यात आली आहेत.