शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

सागरी मार्गाला पर्यावरण विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:09 IST

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे.

कमलाकर कांबळे।नवी मुंबई : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला पर्याय उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने दोन सागरी मार्ग प्रस्तावित केले आहेत. वाशी-ठाणे व पामबीच मार्गाला समांतर असा वाशी ते बेलापूर अशा दोन सागर किनारी मार्गाच्या प्रकल्पाच्या खर्चाची जबाबदारी एमएमआरडीएने स्वीकारली आहे. परंतु पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी या बहुद्देशीय प्रकल्पाला खीळ बसली आहे.शहराचा विस्तार होत असल्याने लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग व ठाणे-बेलापूर हे तीन मार्ग शहरवासीयांसाठी उपलब्ध आहेत. परंतु या मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूककोंडी होते आहे. यातच आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे उपलब्ध रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडणार आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेवून महापालिकेने दोन सागर किनारी मार्ग प्रस्तावित केले आहेत. या मार्गाच्या उभारणीसाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने महापालिकेने यापूर्वीच एमसीझेडएमएकडे प्रस्ताव सादर केला आहे. हे दोन्ही मार्ग खर्चिक आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने या दोन्ही मार्गाची निर्मिती करावी, असा पालिकेचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएने या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाशी ते ऐरोली दरम्यानच्या १२ किमी लांबीच्या मार्गाची निर्मिती होणार आहे. वाशीगाव येथून खाडी किनाºयावरून कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, रबाळे, ऐरोली व दिघा या उपनगरांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. सध्या मुंबईहून येणाºया वाहनांना या उपनगरांत जाण्यासाठी वाशी-कोपरखैरणे किंवा ठाणे-बेलापूर मार्गाचा अवलंब करावा लागतो. प्रस्तावित सागर किनारी मार्गावर उपनगरात प्रवेश करण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. असे असले तरी पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी मागीलतीन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरअभियंता मोहन डगांवकर यांच्याशी बोलायला सांगितले. मात्र डगांवकर यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.

प्रकल्पाचा खर्च ५०३८ कोटी अपेक्षित-वाशी ते ठाणे (१६.९ किमी) व वाशी ते बेलापूर (१0.५ कि.मी) या दोन प्रस्तावित आठ पदरी मार्गासाठी ५0३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च अवाढव्य व महापालिकेला झेपणारा नाही. शिवाय हे दोन्ही मार्ग एमएमआर क्षेत्रात येत असल्याने प्रादेशिक विकासाचा भाग म्हणून हा खर्च एमएमआरडीएने उचलावा, अशी विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यास एमएमआरडीएने तयारी दर्शविल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.