शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

‘झेडपी’च्या चाव्या चोरांच्या हातात नकोत, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 19:55 IST

विकासाचा पैसा योग्य मार्गाने खर्च व्हायचा असेल तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या चोरांच्या हातात देवू नका

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 16 -  विकासाचा पैसा योग्य मार्गाने खर्च व्हायचा असेल तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या चोरांच्या हातात देवू नका असा घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोरोची (ता. हातकणंगले) येथील जाहीर सभेत केली. कोल्हापूर जिल्हयात आता परिवर्तन अटळ आहे. कोणत्याही स्थितीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची बँक दिवाळखोरीत निघाली आहे त्यामुळे त्यामध्ये पुन्हा तुमच्या मतांचे डिपॉझिट ठेवू नका नाहीतर मुद्दलही परत मिळणार नाही अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. भाजप,जनसुराज्य, ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची ही सभा झाली. त्यास रणरणत्या उन्हांतही लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शाहू गु्रपचे समरजित घाटगे, बाबा देसाई, रजनीताई मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वाभिमानी’ बेदखल  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व भाजपच्या संबंधांमध्ये गेल्या कांही दिवसांपासून कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या सभेत संघटनेबध्दल मुख्यमंत्री किंवा अन्य कोण कांही बोलते का याबध्दल उत्सुकता होती परंतू मुख्यमंत्र्यांसह कुणीच संघटनेबध्दल अवाक्षरही बोलले नाही.

  ‘एफआरपी‘ आमच्यामुळेच  उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त ५० टक्केच एफआरपी मिळाली आहे परंतू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ९८ टक्के एफआरपी मिळवून देण्यात राज्य सरकार यशस्वी झाले आहे व एवढी एफआरपी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सदाभाऊंची दांडी सांगलीतील सभेला कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत गळ््यात भाजपचे उपरणे घालून व्यासपीठावर उपस्थित होते परंतू या सभेला मात्र सदाभाऊ आले नाहीत. त्यामुळे उपस्थितीत लोकांतही त्याची चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते परंतू वेळेअभावी ते सभेत बोलले नाहीत. पालकमंत्री असल्याने त्यांनी किमान पाच मिनिटे तरी बोलायला हवे होते अशीही चर्चा यावेळी झाली.

भाषण नव्हे जीआर वाचन मुख्यमंत्री दूपारी साडेतीन वाजता बोलायला उभे राहिले. त्यांनी अर्धा तासात दोन वेळा पाणी पिवून खणखणीत आवाजात भाषण केले परंतू त्यातील २० ते २२ मिनिटे त्यांनी सरकारची कामगिरी सांगण्याच्या ओघात जीआरचेच वाचन केल्यासारखे भाषण केले.