शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीमुळे घिवलीत पाणीटंचाई

By admin | Updated: May 30, 2016 02:42 IST

घिवली गावातील विहिरी गेल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे

पंकज राऊत,

बोईसर- तारापूर अणुउर्जा केंद्र व भाभा अणु संशोधन प्रकल्पाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या भिंतीपलिकडे घिवली गावातील विहिरी गेल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. दोन ते तीन किमी. अंतरावरून दिवसरात्र वणवण फिरून हंडाभर पाणी आणावे लागत आहे. कधी तेही मिळत नाही त्यामुळे पडीक विहिर अथवा खड्डे यातील दूषित पाणी वापरावे लागते आहे. भारतातील पहिल्या तारापूर अणुउर्जा प्रकल्पातील दोन अणुभट्टया व बीएआरसी या दोन्ही प्रकल्पापासून घिवली गाव १.६ किमी. त्रिज्येच्या आत म्हणजे अवघ्या १ कि.मी. असून १९६७-६८ च्या दरम्यान याच गावातील सोन्यासारखी घरे व जमिनी कवडी मोलाने प्रकल्पाकरीता घेतल्यानंतर सुमारे शंभर कुटुंबांचे नवी देलवाडी येथे पुनर्वसन त्यावेळी करण्यात आले तर १९८२ साली गावातील बारा कुटुंबांची घरे, जमीन घेऊन त्यांचेही इतरत्र पुनर्वसन करण्यात आले असून अणु प्रकल्पाच्या १.६ कि.मी. त्रिज्येच्या असलेल्या घिवली गावातील शेकडो कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.या गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार असून या गावात पिढीजात पूर्वीपासून अकरा विहीरी होत्या. त्यापैकी तीन ते चार विहिरींचे पाणी पिण्यासाठी बरीच वर्षे वापरात होते मात्र अणुउर्जा केंद्राने या गावाच्या तिन्ही दिशांना सुमारे पंधरा फुट उंच मजबूत संरक्षक भिंत बांधल्याने या विहिरी भिंती पलीकडे म्हणजेच अणुकेंद्राच्या हद्दीत गेल्यात. गावात अवघ्या तीन विहीरी शिल्लक राहील्या परंतु त्यांचे पाणी अत्यंत दूषित खारट, गढूळ आणि पिण्यास अयोग्य असतांनाही ते पाणी गाळून व उकळून त्यात तुरटी फिरवून वापरावे लागते आहे. १९८६-८७ च्या दरम्यान घिवली गावांतील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा प्रयोगशाळेच्या आलेल्या अहवालानंतर तारापूर अणुउर्जा केंद्राने महारष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माधमातून नळ पाणी योजना सुरू केली मात्र तिची पाणी पाईप लाईन दुरून व वळसा घेऊन टाकल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरेशा दाबाने मिळण्यांत अडथळे येत होते परिणामी पाण्याचे बिल थकत गेले व त्याची रक्कम आता २७ लाखाच्या घरात गेल्याने पाच-सहा महिन्यापासून नळपाणी योजना बंदच आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर हेची फल काय मम तपाला असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे.