शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खडसे विरोधकांच्या मदतीला धावल्याने सत्तापक्षाची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:18 IST

अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा हक्क असतो या विरोधी पक्षांच्या ठाम भूमिकेला चक्क माजी मंत्री आणि भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची आज चांगलीच पंचाईत झाली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा हक्क असतो या विरोधी पक्षांच्या ठाम भूमिकेला चक्क माजी मंत्री आणि भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची आज चांगलीच पंचाईत झाली. या वेळी झालेल्या गदारोळात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावात परस्पर बदल करण्यात आल्याचा आरोप सकाळी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विशेषत: काही खात्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मुद्दे वगळण्यात आल्याचा त्यांचा आक्षेप होता. विरोधकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही विषय प्रस्तावातून वगळण्याची परंपरा नाही. मी विरोधी पक्षनेता असतानाही असे घडत नव्हते, असे सांगत खडसे हे विरोधकांच्या मदतीला धावले. त्या नंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले.तत्पूर्वी, अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. मात्र विधिमंडळाच्या नियमानुसार अंतिम आठवडा प्रस्तावात केवळ एक विषय नमूद करण्याचे स्वतंत्र विरोधकांना आहे याकडे लक्ष वेधून एकाच वेळी अनेक खात्यांचे विषय उपस्थित करण्याची नवी परंपरा सुरु झाली आहे असे सांगत आघाडीचे सरकार असताना विरोधकांच्या प्रस्तावात बºयाचवेळा असे बदल केले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे अध्यक्षांवर असे आरोप करू नयेत, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. तर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी मंत्री केवळ एका खात्याच्या विषयालाच उत्तर देतील, १०-१२ खात्यांच्या प्रश्नांना न्याय देता येत नाही. मंत्री त्याला उत्तर देणार नाहीत, असे बजावले. दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार यांनी याला आक्षेप घेतला़