शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे गाव सुन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 20:48 IST

पती-पत्नीने आत्महत्या केल्याने कुटुंबातील तीन बालके उघड्यावर आल्यामुळे गाव सुन्न झाले आहे.

ऑनलाइन लोकमतकुरूंदा, दि. 28 - वसमत तालुक्यातील कोठारी येथे पती-पत्नीने आत्महत्या केल्याने कुटुंबातील तीन बालके उघड्यावर आल्यामुळे गाव सुन्न झाले आहे. समाजमन हळहळले आहे. या लहान बालकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. कोठारी येथे मयत बालाजी माधवराव पतंगे व वर्षा बालाजी पतंगे या दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. संवेदनशिल मनाचे लोक तर नि:शब्दच झाले. इतरांना किरकोळ वाटावे मात्र आर्थिक आपबितीमुळे पतंगे कुटुंबियांसमोरचा प्रश्न होता तो पितरांना जेवू घालण्याची परंपरा पूर्णत्वास नेण्याचा. यासाठी जवळ पैसे नसल्याने दोघांत कुरबूर झाली. दीड एकरच शेत अन् त्यात कापूस, ज्वारी पेरली. अतिवृष्टीमुळे त्याचेही काही खरे दिसत नव्हते. मराठवाडा ग्रामीण बँकेचे ३५ हजारांचे कर्जही घेतले होते. वाद सुरू असताना या सर्व बाबींचा उहापोह झाला. सर्व बाबी चिंतेच्या खाईत ढकलणाऱ्याच असल्याने पत्नीने आत्महत्येसाठी विहिरीत उडी घेतली. ही घटना पतीला कळाल्यानंतर त्यानेही त्याच विहिरीत उडी घेतली. पती-पत्नीचे प्रेत बाहेर काढल्यानंतर गिरगाव रूग्णालयात या प्रेताचे शवविच्छेदन केले. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एकाच चितेवर पती-पत्नीला अग्निमुख देण्यात आले. या घटनेमुळे ग्रामस्थांची मने हेलावली अन् हादरूनही गेली. छोट्याशा खोपटात अगदी तोकड्या साहित्यावर चालणाऱ्या संसाराला भयाण रुप आले. सुमित पतंगे (६ वर्ष), स्वराज पतंगे (२) तर सुरज पतंगे (७ महिने) हे बालके उघड्यावर आली आहेत. यातील सुमित पहिली वर्गात आहे. मयताला तीन भाऊ व वयोवृद्ध आई आहे. ते वेगवेगळे राहतात. बालकांची चिंता ग्रामस्थांना लागली आहे. शासनाने या बालकांना पाहून तरी मदत द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गावाला सदर प्रतिनिधीने भेट दिली असता गावात शोकाकूल वातावरण होते. या बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी योगेश्वरी प्रतिष्ठाणच्या वतीने घेतल्याचे समजते. आता छत्र हरवलेल्या या बालकांना भविष्यात अडचणी येवू नयेत, यासाठी मदतीचे हात पुढे यावेत, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.