शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात दुबार पेरणीही वाया जाण्याची भीती

By admin | Updated: July 13, 2017 05:03 IST

सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती गंभीर बनली

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/ धुळे/ नंदुरबार : सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती गंभीर बनली आहे. जळगाव जिल्ह्यात दुबार पेरणीही वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अटळ असल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनियमित पावसामुळे केवळ ४३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भरपावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात तब्बल ४५ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ४० टक्के पेरण्यांनी कसाबसा तग धरला असून, ६० टक्के पेरण्या वाया जाण्याची स्थिती आहे. तब्बल २० दिवस पावसाने दडी मारली आहे. बियाणे वाया गेल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी झाली. मात्र बियाण्यास व कोंबांना किडे, मुंग्या लागू लागल्या आहेत. जिल्ह्यात १० जुलैपर्यंत केवळ १९.७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे.धुळे जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारली. पीकवाढीच्या टप्प्यात पाऊस होत नसल्याने त्यांची वाढ खुंटली असून, ती जळण्याच्या मार्गावर आहेत. मूग, उडीद या कडधान्यांसह सोयाबीन, मका पिकांनाही या खंडाचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्याला अनियमित पावसाचा फटका बसला असून, आतापर्यंत केवळ ४३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे़ जिल्ह्यात निर्धारित दोन लाख ६९ हजार क्षेत्रापैकी ३० जूनपर्यंत केवळ दोन हजार ७३५ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या.