शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीवर यंदाही दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 4, 2016 03:46 IST

भात बियाण्याची पेरणी केलेली खाचरे अनेक दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने बियाणे कुजून दुबार पेरणीचे संकट बळीराजाला सतावू लागले आहे.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- डहाणू तालुक्यास मुसळधार पावसाने चांगलेचे जोडपले असून, भात बियाण्याची पेरणी केलेली खाचरे अनेक दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने बियाणे कुजून दुबार पेरणीचे संकट बळीराजाला सतावू लागले आहे. दरम्यान या बाबत शासनाने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डहाणू तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर त्याची खरीपात लागवड केली जाते. तालुक्यात २१ जून नंतर पावसाने हजेरी लावल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी भात पेरणीला प्रारंभ केला. मात्र गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा जोर वाढून नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पाणथळ जमिनीप्रमाणेच बोर्डी आणि परिसरातील किनाऱ्यालगत गावच्या भात खाचरांमध्ये पुराचे पाणी साचले आहे. त्यामुळे पेरलेले बियाणे अनेक दिवस पाण्याखाली राहिल्याने कुजले आहे. तर, काही प्रमाणात उगवण झालेली रोपे सुस्थितीत नाहीत. सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावते आहे. शासनाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून केवळ कर्जत ३ या भात वाणाची विक्र ी डहाणूतील शेतकऱ्यांना केली होती. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी महागाईचा फटका सहन करून ८५ ते ११० रुपये प्रतिकिलोने मिळणारे संकरीत बियाणे खरेदी केले होते. मात्र सततच्या पावसाने पेरणी वाया जाऊन आर्थिक फटका बसला असून लावणीचा हंगाम लांबणीवर गेला आहे. त्याचा परिणाम भात उत्पादनावर होणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.>पावसाने घेतली उसंत; पाणी ओसरल्याने वसईकरांना दिलासावसई : काल रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने वसई विरार परिसरात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन लोकांना दिलासा मिळाला आहे. वसईतील जनजीवन सकाळपासून पूर्वपदावर आले. गेले दोन दिवस वसईकरांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. नालासोपारा शहरात दोन दिवस पाणी तुंबून राहिले होते. नागाव रेल्वे स्टेशनवरील सबवेत पाणी शिरले होते. तर सनसिटी-गास रस्ता दिवभर पाण्याखाली गेला होता. शनिवारी रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने सगळीकडील पाणी ओसरून वसईकरांना दिलासा मिळाला.