शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 11, 2017 04:55 IST

४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी गेल्या आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आतापर्यंत ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी गेल्या आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अद्याप नसले तरी सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात मात्र हे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक आढाव्यानुसार ३६०० हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यंदा ‘रोहिणी’ नक्षत्र काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप पेरणीस गती आली; पण ‘मृग’ नक्षत्र कोरडे गेल्याने काही ठिकाणी उगवणी झाल्या नव्हत्या. ‘आर्द्रा’ नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने या काळात काही भागातील प्रलंबित पेरण्या पूर्ण झाल्या. पिकांची उगवणही चांगली झाली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार हेक्टरवर (५७ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यातील भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या आहेत. भाताच्या १ लाख ८ हजार हेक्टरपैकी ६० हजार हेक्टर तर नागलीच्या २१ हजारांपैकी केवळ १५०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी दुबार पेरणीचे संकट येईल, अशी परिस्थिती सध्यातरी नाही. सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व व त्यानंतरच्या काळात पाऊस जोरदार झाल्याने मशागत लवकर सुरू होऊन गतवर्षीच्या तुलनेत पेरण्यांना गती मिळाली. २ लाख ७८ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर (४७ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १५ दिवसांत २९३ मिलीमीटर (५० टक्के) पाऊस झाल्याने खरिपाची उगवण चांगली झाली आहे. यंदा विशेषत: माण, खटाव, कोरेगावचा दुष्काळी पट्टा या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ४० टक्क्यांपेक्षा कमीच पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरण्या चांगल्या झाल्या आहेत. माण, खटाव तालुक्यात खरीप ज्वारी व बाजरीचे क्षेत्र येथे जास्त असून पावसाअभावी पेरण्या थांबल्या आहेत. ज्या पिकांची उगवण झाली ती पाण्याअभावी करपू लागल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे आहे. सांगली जिल्ह्यात यंदा १ लाख २९ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. ‘आर्द्रा’ नक्षत्र काळात शिराळा, वाळवा, मिरज, जत, आटपाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने खरिपाची उगवणही झाली. सांगलीत आतापर्यंत सरासरी दहा दिवसांत १०५ मिलीमीटर पाऊस झाला. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या असून काही तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.उसावर किडीचा प्रादुर्भाव!कोल्हापूर विभागात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून ३ लाख ४ हजार हेक्टरवर ऊस आहे. अद्याप पाऊस चांगला असल्याने पिके जोमात असली तरी उघडिपीमुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीस पोषक असे वातावरण असल्याने माव्यासह तांबेऱ्याने उसाची पाने भरली आहेत. जिल्हापेरणी हेक्टरपाऊस मिलीमीटर कोल्हापूर१ लाख ५१ हजार३५०.९सांगली१ लाख २९ हजार१०५.६सातारा१ लाख ३२ हजार२९३.०