शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट

By admin | Updated: July 8, 2015 02:40 IST

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ व जुहू विमानतळाजवळ होऊ घातलेल्या गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विमानतळापासून २० कि़ मी. अंतरात बांधकाम करण्यासाठी विमान प्राधिकरण परवानगी देते. याअंतर्गत ४९.८७ मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जात होती. मात्र इमारतींना उंचीसंदर्भात देण्यात येणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्रांचे निकष ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या नेगी समितीने उंचीची मर्यादा ५६.२७ मीटरपर्यंत वाढविली. त्यानंतर २००८ -१२ या काळात जुहू व आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात २०० इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. या इमारतींमुळे मुंबईला विमान दुर्घटनेचा धोका आहे, असा दावा करणारी जनहित याचिका अ‍ॅड. यशवंत शिनॉय यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच या दोन्ही विमानतळांच्या धावपट्टीजवळ सुरक्षेचे कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत. या धावपट्टींजवळ सुरक्षेचे उपाय करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.या याचिकेवर प्रत्युत्तर सादर करताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. ने व नागरी दळणवळण महासंचालकांनी ही जबाबदारी आमची नसल्याचा दावा केला. तर विमानतळ प्राधिकरणाने नेगीच्या रिपोर्टनुसार विमानतळ परिसरात इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे म्हटले आहे. अ‍ॅड. शिनॉय यांनी मंगळवारी या सर्व प्रतिज्ञापत्राचा तपशील न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सांगितला. याचे प्रत्युत्तर सादर करण्यास वेळ मागितला. तसेच या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्याची दखल घेत न्यायालयाने या याचिकेवर पुढील शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)

लँडिंग-टेकऑफवेळी संपर्क तुटण्याची भीती
 
लँडिंग होताना पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात असतो. कंट्रोलच्या दिशा निर्देशानुसार विमानाचे सुरक्षित लँडिंग होते. असे असताना 56.27 मीटर उंचीच्या इमारती विमानतळ परिसरात उभ्या राहिल्यास पायलटचा व कंट्रोलच्या संपर्कातही अडचणी निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. नेमके लँडिंग व टेकऑफवेळी संपर्क तुटल्यास मोठी विमान दुर्घटना होऊ शकते, असा दावा याचिकाकत्र्याने केला आहे.
------------------... शेकडो नागरिकांचा जाऊ शकतो बळीमुळात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराला झोपड्यांचा विळखा अधिक आहे. यामुळे विमान दुर्घटना झाल्यास येथील शेकडो नागरिकांचा बळी जाऊ शकतो. तिच परिस्थिती जुहू विमानतळाची आहे. हा परिसर देखील झोपड्यांनी व्याप्त असून अधिक उंचीच्या इमारतींची संख्या देखील या परिसरात आहे. जुहू विमानतळावर सध्या ओएनजीसीसह खाजगी विमानांचे आवागमन असते.