ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 4 - सेल्फी काढत असताना तोल गेल्याने पवन नामदेव शिंदे (वय २०, रा.धुळे) याचा पाटणादेवी (ता. चाळीसगाव) येथील धवलतीर्थ धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ४ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. पवन हा धबधबा पाहण्यासाठी आला होता. स्वत:च्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो धबधब्यालगतच्या डोहात बुडाला. पोलीस पाटील मनोज साहेबराव परदेशी यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सेल्फी काढताना धबधब्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 23:01 IST