शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
5
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
6
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
7
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
8
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
9
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
10
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
11
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
12
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
13
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
14
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
15
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
16
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
17
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
18
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
19
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
20
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

सचिनच्या शिफारशीमुळेच धोनी कॅप्टन

By admin | Updated: December 25, 2015 10:26 IST

भारताची टीम इंग्लंडला होती त्यावेळी राहूल द्रवीडने सांगितले की मला कॅप्टनशिप नको. माझ्या खेळावर परिणाम होतोय. बॅटिंगवर परिणाम होतो. कुणाला कॅप्टन करायचं?

भारताची टीम इंग्लंडला होती त्यावेळी राहूल द्रवीडने सांगितले की मला कॅप्टनशिप नको. माझ्या खेळावर परिणाम होतोय. बॅटिंगवर परिणाम होतो. कुणाला कॅप्टन करायचं? यावर सचिनचे नाव सुचविले. मात्र, खेळावर परिणाम होतो म्हणून त्यानेही नकार दिला. सचिननेच महेंद्रसिंह धोनीचे नाव सुचविले. राहुल द्रविडला काढलं आणि सचिनला कॅप्टनशिप दिली नाही तर... उद्या पेपरमध्ये छापून आले, की अध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि या दोघांना डावलून धोनीला कॅप्टन केले. मात्र, सचिन म्हणाला, साहेब, मी प्रामाणिकपणे सांगतो, की या देशाला अभिमान वाटावा असा हा कॅप्टन होईल. त्याची खेळाशी कमिटमेंट चांगली आहे. सगळ्या खेळाडूंशी चांगला सुसंवाद आहे. कितीही टेन्शन आले, तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. तुम्ही त्याची निवड करा. निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर होते. समितीने सचिनची शिफारस मान्य केली आणि धोनीची निवड केली. त्याची शिफारस १०० टक्के योग्य ठरली. देशाच्या किक्रेटचा इतिहास घडविण्यासाठी महेंद्रसिंह धोनीने प्रचंड योगदान दिलं. त्याच्या नेतृत्वात देशाने वर्ल्ड कप जिंकला. मला जसे धोनीच कर्तृत्व मोठे वाटते, तसेच सचिनचेही वाटते. कॅप्टनशिप आपल्याकडे येत असतानाही कॅप्टनचे गुण आपल्यापेक्षा दुसऱ्या खेळाडूत अधिक आहेत. तोआपल्या पेक्षा ज्युनियर असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली खेळायची तयारी सचिनने दाखवली. माझ्या मते, हेही मोठे योगदान आहे.

शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा. 
शरद जोशींनी शिकविले अर्थशास्त्र शरद जोशी यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना अर्थशास्त्र शिकवायचे काम केले. आर्थिक व्यवहार, त्यामागची कल्पना सांगण्याबाबतची मांडणी केली; पण शरद जोशींनी जी भूमिका घेतली त्याच्याशी सातत्य ठेवले नाही. कांद्याचे आंदोलन हे पहिले आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्या वेळी मी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभागृहाला बोललो. मी त्यांना सांगितले, याबाबत निकाल घ्यायचे असतील तर ते विधानसभेत घेता येतील, संसदेत घेता येतील. म्हणून तेथे गेले पाहिजे. शरद जोशींचे म्हणणे स्पष्ट होते, की शेतकऱ्यांची चळवळ पुढे न्यायची असेल, तर निवडणुकीपासून बाजूला राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी भाषण केले, ‘मी मत मागायला आलो तर मला जोडे मारा.’ तेच शरद जोशी त्यानंतर काही पक्षांत जाऊन निवडणुकीसाठी उभे राहिले. नांदेड येथे त्यांचा पराभव झाला. मी त्यांना सांगत होतो, की आपण एकत्र काम करू. निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येऊ, शेतकऱ्यांची शक्ती उभी करू. पण तो रस्ता त्यांना पसंत पडला नाही. या कारणावरून आमच्यात मतभेद होते.
 
शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा. 
लोकांच्या शहाणपणामुळेच टिकली लोकशाहीलोकांचा पाठिंबा हा कायमस्वरूपी नसतो. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कधीही मिळालं नव्हतं तेवढं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं. याचं शंभर टक्के श्रेय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला जातं; पण एका वर्षाच्या कालखंडात गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. याचा अर्थ, लोक आम्हा सगळ्यांना कायम स्वातंत्र्य देतात असं नव्हे, आम्ही ठीक रस्त्यावर जातो तोपर्यंत लोक आम्हाला साथ देतात. त्यांच्या मनाला असं वाटलं, की आम्ही ट्रॅक बदलतोय तर त्यासंबंधीचा निकाल द्यायला लोक कधी कचरत नाहीत. या देशाची संसदीय लोकशाही पद्धत जी टिकली आहे, ती देशातील लोकांच्या शहाणपणामुळे टिकली आहे. आमचा शहाणपणा त्याच्यापेक्षा मर्यादित आहे.