शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी असुरक्षित

By admin | Updated: July 22, 2016 01:27 IST

पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी २५ कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या

पिंपरी : छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी २५ कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. आठवड्यातून दोनदा शाळा, महाविद्यालयांना भेटी द्याव्यात, तक्रार पेटीत विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या तक्रारींची दखल घ्यावी, असे सुचविले असताना त्याची अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे होत नसल्याचे लोकमत टीमने केलेल्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. पिंपरी परिसरामध्ये मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या अशा एकूण ११ शाळा आहेत. या शाळांंमध्ये पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसंदर्भात बीट मार्शल पोलिसांना आठवड्यातून दोनदा गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला आहे. या महिनाभरात बीट मार्शल पोलीस किती वेळा शाळेत गस्त घालण्यासाठी आले, ज्या ज्या वेळेस गस्तीवर येतात, त्या वेळेस मुख्याध्यापकांना भेटतात का, शाळेत तक्रारपेटी ठेवली आहे का, तक्रार केल्यावर पोलीस लगेच येतात का, अशा प्रकारची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांकडून जाणून घेतली असता, बहुतांश मुख्याध्यापकांनी बीट मार्शल गस्तीवर येत नसून,शाळेच्या परिसरामध्येही फिरताना दिसले नाहीत, असे सांगितले. विद्यार्थिनींसाठी तक्रारपेटी ठेवण्यात आलेली नसल्याचेही मुख्याध्यापकांनी सांगितले, तर काही मुख्याध्यापकांनी दिवसातून दोन वेळा बीट मार्शल गस्त घालण्यासाठी येतात. मात्र, प्राचार्यांना न भेटता शाळेच्या बाहेरूनच निघून जातात. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थिनींची स्वतंत्र बैठकदेखील घेतली नसल्याचेही प्राचार्यांनी सांगितले.दरम्यान विद्यार्थींनींच्या सुरक्षितेसाठी पोलिसांनी शाळा सुरू होतांना व शाळा सुटण्याच्या वेळेस शाळा परिसरात गस्त घालावी आणि परिसरामध्ये फिरणाऱ्या टवाळखोरांवर कडक कारवाई करावी. आणि शाळेमध्ये तक्रार पेटी ठेवावी.ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्या या पेटीच्या माध्यमातून मांडता येतील. अशी अपेक्षा यावेळी मुख्याध्यापकांनी केली. तक्रारपेटीचा अभावभोसरी : गुंडगिरीमुळे चर्चेत असणाऱ्या या परिसरामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या बाबतीत पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. परिसरातील अनेक शाळांमध्ये तक्रारपेटीच नाही. ज्या काही मोजक्या शाळांमध्ये तक्रारपेट्या होत्या, त्याही धूळ खात पडलेल्या दिसून आल्या.याशिवाय विद्यार्थिनींशी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित पोलीस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन संवाद साधणे गरजेचे आहे. मात्र असे कोणतेही उपक्रम पोलिसांकडून राबवले जात नसल्याचे अनेक शाळांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच शाळा भरते व सुटतेवेळी अनेक टवाळखोर मुले शाळेबाहेरील परिसरामध्ये धिंगाणा घालतात. शिक्षक अथवा पालकांनाही ते जुमानत नाहीत. अनेकवेळा शाळेच्या रखवालदारांबरोबर टवाळखोर तरुण वादही घालतात. त्यामुळे पोलिसांनी शाळा परिसरामध्ये नियमित गस्त घालून रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे. मुलींना टवाळखोरीचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता पालक, शिक्षक किंवा थेट पोलिसांकडे तक्रार करावी. तसेच विद्यार्थिनींना आत्मरक्षण करता यावे, यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस ज्युडो-कराटेचे प्रशिक्षण घेतले जावे, अशी सूचना सुचिता कोळेकर या विद्यार्थिनीने केली. >आकुर्डीत गस्त, निगडीत दुर्लक्ष निगडी : आकुर्डी परिसरात पोलिसांची नियमित गस्त असल्याने या भागात टवाळखोरीस चाप बसला आहे. परंतु, निगडी भागात पोलिसांची गस्त नसल्याने या भागात टवाळखोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, लोकमतने निगडी पोलीस स्टेशन परिसरातील शाळा व महाविद्यालयांचे सर्वेक्षण केले. या वेळी आकुर्डीत टवाळखोरी रोखण्यासाठी नियमित असलेली गस्त, शाळा-महाविद्यालयांना पोलिसांच्या भेटी व तक्रारपेटी या सर्व कारणांमुळे टवाळखोरीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. निगडीमध्ये मात्र शाळा-महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त नसल्याचे सांगण्यात आले.