शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवावर पावसाचे सावट

By admin | Updated: October 3, 2016 03:15 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने गरबाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

मयूर तांबडे,

पनवेल- गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने गरबाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. पावसामुळे गरबा होत नसल्याने तरुणाई नाराज आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्यामुळे नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट दिसून येत आहे. पनवेल शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात शेकडो ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून देवींच्या मूर्तींची स्थापना करण्यात येते. गुजराती समाजात खेळला जाणारा गरबा आता संपूर्ण देशात खेळला जात आहे. त्यामुळे दरवर्षी गरबा/दांडिया खेळणाऱ्यांची व पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक मंडळांनी नवरोत्सवाच्या तीनचार दिवस आधीपासूनच आजूबाजूचा परिसर स्वच्छ व साफ करून घेतला. मात्र यंदा पावसामुळे गरबाप्रेमींचे दोन दिवस वाया गेल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरवर्षी गरबा तसेच दांडिया नृत्यावर मोठमोठी पारितोषिके लावली जातात त्यामुळे गरबा अधिकच खुलतो. पारितोषिके लावल्यामुळे गरबा खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गरबा/दांडियाप्रेमी तर महिनाभर आधीपासून उत्सवाच्या तयारीला लागतात. यात नृत्याचे वर्गही घेतले जातात. पारंपरिक वेशभूषेबरोबरच ज्वेलरी, मोजडी आदींचीही खरेदी केली जाते. सरावासाठी प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात. शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्याचे यादिवशी तरुणाईची गरबा/दांडिया खेळण्यासाठी मोठी गर्दी होते. मात्र यंदा पावसामुळे गरब्याचे दोन दिवस वाया गेले आहेत. सार्वजनिक मंडळाची मैदानेही सुनेसुने आहेत. गरबाप्रेमीना आर्केष्ट्राद्वारे तरु णाईला फेर धरता आले नाहीत. त्यामुळे ते नाराज झाले आहेत.नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे. आकर्षक कपडे, दांडिया, आल्हाददायक मोजडी आणि दागिने बाजारात उपलब्ध आहेत. पनवेलच्या बाजारपेठेत नवरात्रीनिमित्त विविधरंगी पेहराव दाखल झाले आहेत. यासाठी व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणावर सूरत आण िगुजरातहून खरेदी केल्याचे चित्र दिसत आहे. दांडिया आण िगरबा खेळताना पारंपरिकतेचा लूक येण्यासाठी खास करून तरु णाई सजग आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या दांडिया घेऊन तरु णाई सज्ज आहे. मात्र पावसामुळे रंगाचा बेरंग झाल्याची प्रतिक्रि या तरु णाई देत आहे.