शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात लिहिलेल्या कवितांमुळे खुनी ज्ञानेश्वरचा फास सुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:14 IST

सर्वोच्च न्यायालयाने दाखवली दया : माणुसकीची लक्षणे दिसल्याने दिली जन्मठेप

- अजित गोगटे।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तुरुंगात लिहिलेल्या कवितांमुळे फाशीऐवजी जन्मठेप ठोठावून ज्ञानेश्वर सुरेश बोरकर या गुन्हेगाराला सर्वोच्च न्यायालयाने जीवदान दिले आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड येथील एका डॉक्टर दाम्पत्याच्या १३ वर्षांच्या मुलाचे पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याबद्दल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती.

सासवड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक माईणकर व नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी या दाम्पत्याच्या हृषिकेश या मुलाचा खून केल्याबद्दल पुण्याच्या सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने आॅगस्ट २००५ मध्ये कायम केली होती. याविरुद्ध ज्ञानेश्वरने केलेले अपील गेली १५ वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. न्या. ए. के. सिक्री, न्या. एस. अबुल नझीर व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने ज्ञानेश्वरची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप दिली. या शिक्षेत सवलत मिळण्यासाठी तो राज्य सरकारकडे अर्ज करू शकेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. ज्ञानेश्वरच्या वतीने ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी खुनाबद्दल दोषी ठरविण्याचा निर्णय मान्य केला. मात्र फाशी का दिले जाऊ नये, एवढेच मुद्दे मांडले. सरकारतर्फे अ‍ॅड. दीपा कुलकर्णी यांनी त्याला जराही दया दाखवू नये, असा आग्रह धरला.डॉक्टरांचे कुटुंब उद््ध्वस्तडॉ. माईणकर दाम्पत्यास ऋता व हृषिकेश अशी दोन अपत्ये होती. खून झाला तेव्हा हृषिकेश १३, तर ऋता १४ वर्षांची होती. भावाचा खून झाल्याच्या धक्क्यातून ऋता बाहेर आली नाही. सन २००३मध्ये तिने आत्महत्या केली. आता साठीकडे झुकलेल्या डॉ. अशोक विषण्ण मनोवृत्तीत आहेत. डॉ. अश्विनीही हताश आहेत. ज्ञानेश्वरची आई विधवा आहे व तिचा हा मोठा मुलगा आहे, याचा न्यायालयाने विचार केला. पण न्यायालयाच्या या दयाबुद्धीने या डॉक्टर दाम्पत्याच्या दोन्ही अपत्ये गमावण्याच्या कधीही न भरून निघणाऱ्या दु:खावर फुंकर घातली जाईल की डागण्या दिल्या जातील, हे सांगणे कठीण आहे.फाशी रद्द करताना विचारात घेतलेले मुद्देगुन्हा केला तेव्हा ज्ञानेश्वर २२-२३ वर्षांचा होता.च्त्याने १८ वर्षांचा तुरुंगवास भोगलाच्तुरुंगात त्याची वागणूक चांगली होती. तुरुंगातच तो बीए झाला व त्याने गांधीवादी विचारांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.च्त्याने तुरुंगात केलेल्या कवितांतून त्याला चूक उमगल्याचे दिसून येते.च्तो सुधारू शकतो व त्याचे पुनर्वसनही होऊ शकते. तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुन्हा वावरू शकतो.च्तो पुन्हा तसाच गुन्हा करण्याची शक्यता नाही व त्याच्यापासून समाजास धोकाही नाही.