शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संसदीय कामकाजामुळेच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलो

By admin | Updated: November 20, 2014 02:31 IST

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधिमंडळात पूर्णवेळ उपस्थित राहीलो. जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक संसदीय आयुधाचा वापर केला

मुंबई : आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधिमंडळात पूर्णवेळ उपस्थित राहीलो. जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक संसदीय आयुधाचा वापर केला. संसदीय कामकाजातील या सहभागामुळेच आज आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. विधीमंडळ सचिवालय आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राने नवनिर्वाचित आमदारांसाठी आयोजित दोन दिवसीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. १३ व्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांची संख्या १३० आहे. त्यांच्यासह सर्वच आमदारांना विधीमंडळ कामकाजाची माहिती देण्याच्या उद्देशाने अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एक आमदार म्हणून अनेक प्रशिक्षण वर्गांना उपस्थित राहिल्याने अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, असे त्यांनी सांगितले. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता आणि आ. गिरीष बापट यांनीही सदस्यांना मार्गदर्शन केले. विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी प्रास्ताविक केले. या अभ्यासवर्गात उद्या गुरुवारी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. निलम गो-हे, विधीमंडळाचे सचिव अनंत कळसे यांचे मार्गदर्शन होणार आहे.