शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नियमांची पायमल्ली न केल्याने चालकाला मारहाण ; उद्योगपती नेस वाडियांचा प्रताप

By admin | Updated: May 19, 2016 19:12 IST

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाला मारहाण केल्याच्या आरोपावरुन चर्चेत आलेले उद्योगपती नेस वाडिया पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १९ : बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाला मारहाण केल्याच्या आरोपावरुन चर्चेत आलेले उद्योगपती नेस वाडिया पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गाडी पळवित नसल्याने स्वत:च्याच चालकाला वाडिया यांनी शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी चालकाने एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारदार विरेंद्र मिश्रा वाडियांकडे गेल्या तीन वर्षांपासून चालक म्हणून काम करतात. वाकोला येथील डिमेलो कम्पाऊंड येथे मिश्रा राहण्यास आहे. बुधवारी दुपारी वाडिया यांना फोर्ट येथे महत्त्वाच्या बैठकीसाठी जायचे असल्याने त्यांनी गाडी बाहेर काढण्यास सांगितले. त्यानुसार मिश्रा याने गाडी (एमएच ०१ बीबी १३०१) बाहेर काढली. फोर्ट परिसरात लवकर पोहचायचे असल्याने त्यांनी मिश्राला गाडी जलदगतीने चालविण्यास सांगितली. रस्त्यात येणारे सिग्नलकडेही त्यांनी दुर्लक्ष करण्याचा सल्ला मिश्राला दिला असल्याची माहिती मिश्राने पोलिसांना दिली. मात्र, मिश्राने वाहतूकीचे नियम पाळत सिग्नल तोडले नाही. त्याचप्रमाणे गाडीचा वेग देखील जेमतेम ठेवला असल्याने नेसवाडियांचा रागात भर पडली. त्यांनी पाठिमागून मिश्राला शिविगाळ देण्यास सुरुवात केली. तसेच जे.जे उडडाणपुलावरुन खाली उतरल्यानंतर त्यांनी चालकाला लाथा मारण्यास सुरुवात केली. अशावेळी मिश्राने गाडी रस्त्याच्या बाजुला लावून तो बाहेर निघाला. संतापलेल्या मिश्राने गाडी चालविण्यास नकार दिला. तर वाडियाने मिश्राला शिविगाळ करत स्वत: गाडी चालवित ते तेथून निघून गेले. त्यानंतर मिश्राने एमआरए मार्ग पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी वाडिया विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मिश्राच्या तक्रारीची नोंद करत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिली.