शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोमध्ये दंड बसू नये म्हणून त्यानं चक्क 30 फुटांवरुन मारली उडी

By admin | Updated: June 27, 2017 11:14 IST

मेट्रो स्टेशनवर केवळ दंड भरावा लागू नये म्हणून 18 वर्षांच्या तरुणानं 30 फूट उंचावरुन खाली उडी मारली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - मुंबई मेट्रोतील एक अजब व तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. मेट्रो स्टेशनवर केवळ दंड भरावा लागू नये म्हणून 18 वर्षांच्या तरुणानं  30 फूट उंचीवरुन खाली उडी मारली आहे. इतक्या उंचीवरुन उडी मारुनही सुदैवानं हा तरुण बचावलादेखील आहे.  रविवारी (26 जून) रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली आहे.
 
राजकुमार असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा ओडिशामधील रहिवासी आहे. ज्यावेळी सुरक्षा रक्षकांनी राजकुमार पकडलं तेव्हा तो नशेत असल्याचंही समोर आले. त्यावेळी चौकशीदरम्यान राजकुमारनं सांगितले की, तो साकी नाका मेट्रो स्टेशनहून घाटकोपर येथे आला. घाटकोपर येथे पोहोचल्यानंतर त्यानं टोकणचा वापर केला मात्र ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) गेट उघडलं नाही.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारनं बाहेर येण्यासाठी AFC गेट वरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं सुरक्षारक्षकांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. नंतर तो तिकीट काऊंटर परिसरात आला, मात्र यावेळी मेट्रो कर्मचा-यांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. यावेळी सुरक्षा कर्मचारी राजकुमारला कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये घेऊन जात असताना त्यानं पळ काढला व 30 फुटांवरुन खाली उडी मारली. 
 
यानंतर घाटकोपर पोलिसांच्या मदतीनं त्याला रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, तिकीट काढल्यानंतरही गेट का उघडलं नाही अशी विचारणा मेट्रो अधिका-याला केल्यानंतर त्यांनी सांगितले की, राजकुमारनं घाटकोपरपर्यंत तिकीट काढलं होतं. मात्र येथे आल्यानंतर तो स्टेशनवर फिरत होता. तिकीट काढल्यानंतर एक तासानंतर टोकण अमान्य होते.
 
राजकुमार जानेवारी महिन्यात मुंबईत आला होता आणि सध्या ते बोरिवली येथे वास्तव्यास आहे. राजकुमार सुरुवातील सांगितले की, घाटकोपरमध्ये नातेवाईकाला भेटण्यासाठी आला होता मात्र त्यानंतर तो म्हणाला की जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होण्यासाठी आलो होतो.