शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे मातेसह बालकाचा मृत्यू,आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर;मेळघाटातील घटना                            

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 18:15 IST

मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला.

पंकज लायदे अमरावती, दि. 24 - मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून मेळघाटातील माता व बालमृत्यूचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आरोेग्य विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, राणीगाव ग्रामपंचायतीअंतर्गत एक मोबाईल आरोग्य पथक असून त्यांना पाच गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये राणीगाव, सिनबंद, कंजोली, मोथाखेडा व गोलाई या गावांचा समावेश आहे. या आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारीच नाही. फिरत्या पथकातील आरोग्य अधिका-यांना प्रतिनियुक्तीवर बैरागड येथे पाठविल्याने ही ५ गावे वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. परिणामी कंजोली येथे माता व बालमृत्यूची घटना घडली. 

याठिकाणी गर्भवती महिलांची वेळेवर तपासणी केली जात नाही, त्यांना वेळेवर औषधोपचारही मिळत नाही. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने प्रसूतीचा प्रश्नच येत नाही. यामुळेच सविता सावलकर हिचा मृत्यू झाला. सविताला २३ आॅगस्टच्या मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्यात. डॉक्टर आणि संदर्भसेवादेखील प्राप्त न झाल्याने घरीच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे एका मातेसह व नवजाताचा जीव गेल्याने गावकरी संताप व्यक्त करीत आहेत. एकीकडे आरोग्यमंत्री मेलघाटात येऊन उत्तम आरोग्यसेवा देण्याचा दावा करतात, तर दुसरीकडे मेळघाटात आरोग्यसेवा न मिळाल्याने माता व बालमृत्यू होताहेत. यासाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.     

१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत निवासी डॉक्टर नसल्याचा ठराव घेण्यात आला होता. त्या ठरावासह निवेदनसुद्धा आरोग्य विभागाला देण्यात आले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने बाल व मातामृत्यूची ही घटना घडली. - लक्ष्मण भिलावेकर,सदस्य, ग्रामपंचायत, राणीगाव