शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

नव्या पटपडताळणी आदेशामुळे दमछाक

By admin | Updated: February 23, 2015 03:11 IST

शालेय पटपडताळणीच्या धर्तीवर राज्यातील बालगृहांची त्रयस्थ यंत्रणेकडून पटपडताळणी करावी, असे आदेश महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : शालेय पटपडताळणीच्या धर्तीवर राज्यातील बालगृहांची त्रयस्थ यंत्रणेकडून पटपडताळणी करावी, असे आदेश महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. पण यापुर्वी सादर करण्यात आलेले अहवाल धुळखात पडून आहेत. त्यातच मुंडे यांच्या आदेशानुसार नव्याने पटपडताळणी करून अहवाल येईपर्यंत बालगृहांची चांगलीच दमछाक होणार आहे. बाल न्याय अधिनियम २००० आणि २००६च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या बालगृहांची दरवर्षी शासनाच्या अन्य विभागाच्या पथकांमार्फत सखोल तपासणी होते. या तपासणीनंतरच्या अहवालाचे बालगृहांचे श्रेणी वर्गीकरण केले जाते. मात्र या तपासण्यांचे अहवाल शासनाकडे पाठवले नसून, आयुक्तालयात ते धूळखात पडून असल्याचे वास्तव समोर आले आहे. २०११च्या आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शालेय पटपडताळणीच्या धर्तीवर राज्यातील सर्व बालगृहांची व्हीडीओ शूटिंग करून पडताळणी करण्यात आली. यातून योजनेतील सातत्य आणि अनियमितता हा निकष प्रमाण मानून तत्कालीन महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी नोव्हेंबर २०१२ला १८८ संस्थांची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली. त्यानंतर सातत्याने म्हणजेच डिसेंबर २०१२, जुलै २०१३ आणि अॉगस्ट २०१४ला अन्य जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बालगृहांच्या तपासण्या केल्या गेल्या.गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत नेमलेल्या ५ सदस्यीय पथकाकडून दिवसा आणि रात्रीसुद्धा राज्यातील बालगृहांची एकाच वेळी तपासणी केली. याचे ‘रिपोर्टिंग’ संबंधित पथकांनी महिला बालविकास विभागाच्या पुणेस्थित आयुक्तालयाला वेळेत सादर केले, पण आयुक्तालयाने मात्र आज अखेर या तपासण्यात आढळून आलेल्या बाबींचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवलाच नाही, परिणामी बालगृहांची अ, ब, क आणि ड अशी श्रेणीची वर्गवारी होऊच शकलेली नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तपासणीमधील बाबी शासनाकडे वेळीच न पाठवण्यामागचे ‘गौडबंगाल’आहे तरी काय? यामागे कोणाचा ‘अर्थ’पूर्ण व्यवहार तर नाही ना? या साऱ्या गंभीर प्रकारची चौकशी करून दोषी यंत्रणेवर कारवाईची मागणी बालगृह चालक संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)