शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

मंदाताईंमुळे दारूबंदी आंदोलनाला बळ

By admin | Updated: September 2, 2014 02:10 IST

उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात दारूबंदीची सर्रास पायमल्ली होत आहे.

गडचिरोली : उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात दारूबंदीची सर्रास पायमल्ली होत आहे. दारूने अनेकांचे जीव घेतल्यानंतर आता गावागावातील महिलांनीच दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शेकडो महिलांसह भामरागडसारख्या दुर्गम भागात दारूविक्रेत्यांवर धाडी घालून अवैध मद्यसाठा जप्त करण्यास पोलिसांना भाग पाडले. मंदाताईंचे हे आंदोलन गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकत्र्यासाठी  प्रेरणादायी ठरले आहे.
महाराष्ट्रात वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत 3क् ते 35 दारूदुकांनाचा वेढा पडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापारी येथे राजरोसपणो माल पुरवितात. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दुकाने थाटण्यासाठी नव्याने परवाने देण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनावर नक्षलविरोधी मोहिमेची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून दारूबंदी मोहीम व्यापक प्रमाणावर राबविण्यात अडचणी आहेत. मात्र उत्पादन शुल्क विभाग कारवाईत मागे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पोळ्याच्या दिवशी आरमोरी तालुक्याच्या वनखी गावात एका तरुणाचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. 
भामरागड गावात पुन्हा खुलेआम दारू विक्री सुरू झाल्याने डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह शेकडो महिलांनी गावातील दारूविक्रेत्यांवर धाड मारली आणि पोलिसांना साडेचार लाखांची दारू जप्त करण्यास भाग पाडले. मंदाताईंच्या दारूबंदीविषयक भूमिकेमुळे आंदोलक महिलांना बळ मिळाले आहे. (प्रतिनिधी)