शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेमार्गावर मेल-एक्स्प्रेस गाड्यांमुळे मनस्ताप

By admin | Updated: December 26, 2015 01:53 IST

मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांना सध्या गर्दीला सामोरे जावे लागत असून, गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांना सध्या गर्दीला सामोरे जावे लागत असून, गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा प्रयत्न केला जात असतानाच लोकल गाड्यांना होणाऱ्या गर्दीचे आणखी एक कारण पुढे आले आहे. मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात मेल-एक्स्प्रेस धावत असून, त्यामुळे दररोज २५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. लेटमार्क लागत असल्याने या लोकल गाड्यांना बरीच गर्दी होत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डोंबिवलीकर भावेश नकाते याचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अशा घटना होऊ नयेत यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून एक समितीही नेमण्यात आली. या समितीकडून गर्दीतला प्रवास सुकर करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत. सध्या या समितीकडून काही सूचना करण्यात आल्या असून, त्यावर रेल्वेकडून अंमलबजावणीही केली जात आहे. तत्पूर्वी लोकलमध्ये गर्दी वाढण्यामागची कारणे रेल्वेकडून शोधली जात असून, यात मध्य रेल्वेमार्गावर मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल गाड्यांना चांगलाच लेटमार्क लागत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या जवळपास २२0 मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्या आहेत. या मेल-एक्स्प्रेसमुळे दररोज २५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. गर्दीच्या वेळेस फटकालेटमार्क लागणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गर्दीच्या वेळेत धावणाऱ्या लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. हा लेटमार्क ५ मिनिटे ते १५ मिनिटांपर्यंतचा आहे.लेटमार्क लागल्याने लोकल गाड्यांना बरीच गर्दी होते. सीएसटी ते कल्याणदरम्यान जलद लोकल गाड्यांना आणि कल्याणपासून पुढे डाऊनला धीम्या व जलद लोकल गाड्यांना लेटमार्क होत असल्याचे सांगण्यात आले.1618लोकल फेऱ्या मध्य रेल्वेमार्गावर होतात. यातील दोन टक्के लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. जलद मार्गावरील बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, कल्याण जलद लोकल गाड्यांना सकाळी व संध्याकाळी गर्दीला सामोरे जावे लागत आहे.