शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवशाही’ न आल्याने बुडाले उत्पन्न

By admin | Updated: June 20, 2016 04:01 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बस आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा लोकार्पण सोहळा या वर्षाच्या सुरुवातीला पार पडला.

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बस आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा लोकार्पण सोहळा या वर्षाच्या सुरुवातीला पार पडला. महामंडळाकडून एप्रिल ते जून या गर्दीच्या हंगामात शिवशाही बस ताफ्यात आणल्या जाणार होत्या. मात्र अद्यापही बस दाखल न झाल्याने गर्दीच्या दोन महिन्यांतील हंगामात जवळपास सात कोटींपेक्षा जास्त अपेक्षित उत्पन्नावर एसटी महामंडळाला पाणी सोडावे लागले आहे. एसटी महामंडळाचे प्रवासी कमी होण्याबरोबरच उत्पन्नही कमी होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी मिळविण्यासाठी महामंडळाकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. यात खासगी बस कंपन्यांनी स्पर्धा निर्माण केल्याने एसटी महामंडळाने उत्तम दर्जाच्या बस ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:च्या जवळपास ७0 एसी बस विकत घेतल्यानंतर महामंडळाकडून भाड्याच्या ५00 एसी बसही दाखल केल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस या दोन सेवा प्रकारांचा समावेश असलेल्या ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया मागील वर्षात सुरू करण्यात आली. या बसचे नामकरण करीत त्याचे नाव ‘शिवशाही बस’ असेही करण्यात आले आणि २0१६ च्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने काही योजनांचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पाडतानाच शिवशाही बस सर्वांसमोर सादर करण्यात आली. या बस एसटी महामंडळाकडून १५ एप्रिल ते १५ जून या गर्दीच्या हंगामात चालविण्यात येणार होत्या. मात्र गर्दीचा हंगाम उलटूनही एकही बस ताफ्यात दाखल झालेली नाही. एका बसमागे २,५00 रुपये याप्रमाणे ५00 बसमागे दिवसाला १२ लाख ५0 हजार रुपये अपेक्षित उत्पन्न महामंडळाने गृहीत धरले होते. परंतु बस गर्दीच्या हंगामात दाखल न झाल्याने सात कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर महामंडळाला पाणी सोडावे लागले आहे. अजूनही शिवशाही बसची बांधणी सुरू असून त्या बस कधी ताफ्यात दाखल होतील, यावर ठोस असे उत्तर महामंडळाकडे नाही. (प्रतिनिधी)