शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी एसटीपीचे काम रखडेल

By admin | Updated: June 25, 2016 03:54 IST

नाशिकमधील गोदावरी नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. उच्च न्यायालयाने येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) दुरुस्त करण्याचे

मुंबई : नाशिकमधील गोदावरी नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. उच्च न्यायालयाने येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) दुरुस्त करण्याचे व नवे बांधण्याचा आदेश वारंवार देऊनही हे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. राज्य सरकार निधी देत नसल्याने हे काम रखडल्याची सबब नाशिक महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने महापालिकेला किती कालावधीत निधी देणार, अशी विचारणा राज्य सरकारकडे शुक्रवारच्या सुनावणीत केली.नाशिक महापालिका व इचलकरंजी नगर परिषद प्रक्रिया न केलेले सांडपाणी गोदावरी नदीत सोडत असल्याने नदीचे प्रदूषण वाढत आहे. तसेच येथील कारखानेही नदीच्या प्रदूषणात भर घालत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचे आदेश महापालिका व नगर परिषदेला द्यावे, यासाठी नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. कोर्टाने एसटीपीचे कामकाज कुठवर आले आहे, अशी विचारणा पालिकेकडे केली. त्यावर पालिकेने सरकारने निधी न दिल्याने नवे एसटीपी बांधण्याचे व जुन्या एसटीपीची क्षमता वाढवण्याचे काम खोळंबल्याचे खंडपीठाला सांगितले. खंडपीठाने किती कालावधीत निधी देण्यात येणार, अशी विचारणा करीत सरकारला ८ जुलैपर्यंत माहिती देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)