शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या मध्यस्थीमुळे वीजप्रश्न निकाली

By admin | Updated: August 26, 2016 02:23 IST

वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता

नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यात २४ ग्रामपंचायती असून वीज मंडळाने ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या पोलवरील एखादा बल्ब अथवा ट्यूब खराब अथवा बंद पडल्यास वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता. प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची व्यथा आ. पंडित पाटील यांच्या पुढे मांडण्यात आली होती. याची दखल घेऊन आमदारांनी हा प्रश्न सोडविला आहे.ग्रामपंचायतीकडे कोणताही प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे पोलवर चढून दुरु स्तीचे काम करणे फार कठीण होते. याबाबत काही ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत यांच्याशी संपर्कसाधून आपली व्यथा मांडली होती. मनोज भगत यांनी हा प्रश्न आमदार पंडित पाटील यांच्याकडे मांडला व ग्रामपंचायतींना दिलासा देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आमदार पाटील यांनी बुधवारी वीज मंडळाचे पेण येथील अधीक्षक अभियंता युसूफ शेख यांची कार्यालयात भेट घेऊन ग्रामपंचायतीची बाजू मांडली यावेळी ते म्हणाले की, ग्रामपंचायतीची आर्थिक बाजू सक्षम नसून प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करणे ही कठीण बाब आहे.उंच पोलवर चढणे हे ग्रामपंचायत कर्मचारी यांना जमणारच नाही.वीज मंडळाचे कर्मचारी हे प्रशिक्षित आहेत त्यांचे काम त्यांनाच करून द्यावे. ग्रामपंचायत सर्व सहकार्य करेल परंतु पोलवरची कामे ही वीज कर्मचारी यांनीच केली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. यावर अधीक्षक अभियंता युसूफ शेख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका उपकार्यकारी अभियंता यांना पोलवरील सर्व कामे हे आपलेच कर्मचारी करतील प्रत्येक कर्मचारी यांनी ग्रामपंचायत यांना सहकार्य करावे असे आदेश दिले.या झालेल्या निर्णयामुळे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला असून आमदार पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुडचे वीज मंडळाचे उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधीक्षक अभियंता यांचे आदेश प्राप्त झाले असून आमचे वीज कर्मचारी ग्रामपंचायतीस सहकार्य करतील असे सांगितले आहे.(वार्ताहर) >वीजपुरवठा होणार सुरळीतआमदार पंडित पाटील म्हणाले की, मुरु ड शहराचा जो कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.कमी दाबाच्या वीज पुरवठ्यापासून मुरु डकरांची कायम मुक्तता होणार असून वीज मंडळाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे वीज पुरवठा आत्ता सुरळीत होणार आहे असे त्यांनी सांगितले.