शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या खर्चात वाढ

By admin | Updated: July 20, 2015 01:34 IST

एसटी महामंडळ सध्या वाढीव खर्चाचा डोंगर सहन करत असून यात सर्वात मोठ्या अशा डिझेल दरवाढीच्या खर्चाचा समावेश आहे. एसटी महामंडळाने मागील

मुंबई : एसटी महामंडळ सध्या वाढीव खर्चाचा डोंगर सहन करत असून यात सर्वात मोठ्या अशा डिझेल दरवाढीच्या खर्चाचा समावेश आहे. एसटी महामंडळाने मागील आर्थिक वर्षात (२0१४-१५) डिझेलवर तब्बल २ हजार ६00 कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. या खर्चात त्याआधीच्या आर्थिक वर्षाशी (२0१३-१४) तुलना केली असता १८२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.एसटी महामंडळाकडे सध्या १८ हजार बसेस असून या डिझेलवर धावणाऱ्या आहेत. या बसमधून एसटी महामंडळ जवळपास दर दिवशी लाखो प्रवाशांची वाहतुक करते. अशा या एसटी महामंडळाला डिझेलचा मोठा खर्च सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाला गर्दीच्या काळात साधारणत: १३ लाख ५० हजार लिटर डिझेल प्रत्येक दिवशी लागते. तर इतर दिवशी हेच डिझेल दिवसाला ११ लाख लिटर एवढे लागते. हे पाहता जवळपास वर्षाला ४0 ते ४१ कोटी लिटर डिझेल एसटी महामंडळाला लागत आहे. मात्र या डिझेलच्या दरात गेल्या आर्थिक वर्षात वाढ होत असल्याने मोठ्या खर्चाला महामंडळाला सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. मे २0१४ मध्ये डिझेलच्या दरात १ रुपये ९ पैसे वाढ झाली. मे महिन्यानंतर डिझेलच्या दरात त्वरीत दोन वेळा ५0 पैशांची वाढ झाली आणि त्यात सतत चढ-उतार होत गेले. मात्र यामुळे महामंडळाला डिझेलच्या खर्चाचा ताळमेळ व्यवस्थित राखता आला नाही.