शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील ‘नेकी की दिवार’ मुळे ७ हजारावर गरजूंना मिळाले कपडे

By admin | Updated: June 4, 2017 14:31 IST

संत गाडगेबाबा महाराज यांच्या भुकेल्यांना अन्न, बेघरांना घर या उक्तीप्रमाणे गोर-गरीबांना कपडे मिळावे, यासाठी माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांनी

किशोर पाटील/ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 4 -  संत गाडगेबाबा महाराज यांच्या भुकेल्यांना अन्न, बेघरांना घर या उक्तीप्रमाणे गोर-गरीबांना कपडे मिळावे, यासाठी माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांनी बी़ज़े मार्केटजवळील पोलीस चौकीजवळ ‘नेकी की दिवार’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातंर्गत गेल्या सहा महिन्यात सात हजारावर गरजूंना कपडे मिळाले आहेत़ ऊन, थंडी व पाऊस या गोष्टींपासून बचावासाठी अंगावर कपडे नसलेले गोर-गरीब चिमुकले, पुरूष असे विदारक चित्र माजी नगरसेवक अरूण शिरसाळे यांनी बघितले़ अशा गरजूंसाठी कपडे मिळावेत, यासाठी ‘नेकी की दिवार’ ही संकल्पना शिरसाळे यांना सुचली. अनेकांकडे जुने कपडे असतात, त्याच उपयोग केला जात नाही... असे सर्व कपडे एका ठिकाणी जमवून त्याचा गोरगरीबांना प्रत्यक्ष लाभ व्हावा, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. रॅक, दोरीवर नियमित कपडे-कपडेच ८ डिसेंबर २०१६ रोजी ‘ नेकी की दिवार’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला़ सुरवातीपासून या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला़ अनेक महिला, पुरूष स्वत:चे घरातील लहान मुलांचे जुने कपडे याठिकाणी ठेवून जातात़ गोर-गरीब गरजू, निराधार मुले, पुरूष तसेच महिला या ठिकाणी हक्काच्या घराप्रमाणे येतात व पाहिजे तेवढे कपडे घेवून जातात़ दुकानातून नवीन कपडे घेतल्याप्रमाणेच गरजूंचा नेकी की दिवार येथून कपडे उचलताना आनंद असतो़ सहा महिन्यात एकही दिवस असा गेला नाही की याठिकाणी कपडे नाहीत. शहरातील प्रत्येक गरीब तसेच नागरिकापर्यंत नेकी की दिवार पोहचली आहे़ आता नागरिक पादत्रानेही आणून देऊ लागले आहेत. कोट गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद हेच समाधान नेकी की दिवार वर अनेक जण कपडे ठेवताना दिसतात़ काही वेळाने गरजू हे कपडे घेवून जातात़ त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आपले समाधान आहे़ भविष्यात गरीबांसाठी आणखी काय करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे़ आणखी इतर ठिकाणीही नेकी दिवार हा उपक्रम सुरू करण्याबाबत विचार आहे़. म्हणजे प्रत्येक गरजूला कपडे मिळू शकतील़ - अरूण शिरसाळे, माजी नगरसेवक, जळगाव