शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपामुळे रमझानमध्ये फळांऐवजी सुक्या मेव्याला अधिक पसंती!

By admin | Updated: June 6, 2017 02:02 IST

ऐन रमजानमध्ये शेतकऱ्यांनी पुकारल्याने संपाचा फटका फळांच्या पुरवठ्यावर झाला आहे.

अक्षय चोरगे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऐन रमजानमध्ये शेतकऱ्यांनी पुकारल्याने संपाचा फटका फळांच्या पुरवठ्यावर झाला आहे. फळांची आवक घटल्याने, इफ्तारीसाठी पुरेसा पुरवठा होत नसल्याने मुस्लीम बांधवांची पसंती सुक्या मेव्याला मिळत आहे. खजुराला विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र शहरातील बाजारांमध्ये पाहायला मिळत आहे.मुस्लीम बांधवांमध्ये रमजान महिन्यात रोजा सोडताना खजूर खाण्याला महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक मुस्लीम बांधव खजुराची खरेदी करताना दिसतो. खजुरासह रमजानमध्ये सुक्या मेव्याची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यात फळांची आवक घटल्याने किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांकडून सुक्या मेव्याला अधिक पसंती मिळत असल्याचे मस्जिद बंदर येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी या काळात फळबाजारात होणारी गर्दी यंदा कमी झाल्याचे पाहावयास मिळते.सुक्या मेव्यात बदाम प्रति किलो १ हजार रुपयांपासून १ हजार ४०० रुपये दराने विकले जात आहेत, तर काजूची किंमत बदामापेक्षा थोडी जास्त असून, ग्राहकांना प्रति किलोसाठी १ हजार १०० ते १ हजार ६०० रुपये मोजावे लागत आहेत. सुक्या मेव्याच्या बाजारात खजूर भलताच भाव खाऊन जात आहे. शंभर रुपयांपासून तब्बल २ हजार रुपये किलो दराने खजुराची विक्री होत आहे. यामध्ये अजवा खजुराची किंमत प्रति किलो २ हजार रुपयांहून अधिक आहे. खजुरांची मिजासच न्यारी!मुंबईतील बाजारांमध्ये परराज्यासह परदेशातून मोठ्या प्रमाणात खजुराची आयात केली जाते. इराण, अल्जेरिया, इराक, इंडोनेशिया, मस्कत, ओमान या देशांमधील खजुरांना विशेष मागणी आहे. कश, इराकी, इराणी, अंगुरी, किमिया, शबानी, तईबा, सिडलेस खजूर (बी विरहित खजूर), ओमानी रसगुल्ला खजूर अशा नानाविध प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत.>...म्हणून खजुराला मागणी!दिवसभर रोजा ठेवल्यानंतर संध्याकाळी सुका मेवा, खजूर आणि फळे खाल्ल्यानंतर दिवसभरात शरीराला आलेला थकवा पळून जातो, असे मुस्लीम बांधवांचे म्हणणे आहे. खजूर आरोग्यदायी तर आहेच. मात्र, इतर सुक्या मेव्याच्या तुलनेत स्वस्त असल्याने, खजुराला सर्वच थरांतून अधिक मागणी असते.>कुराणमध्येही खजुराला महत्त्व!खजुराला कुराणमध्ये महत्त्व आहे. खजूर खाऊन रोजा सुरू करावा आणि रोजा सोडावा, असे मोहम्मद पैगंबर सांगत. याशिवाय खजूर हे फळ स्वर्गातून आपल्याला मिळालेली देणगी आहे, असेही इस्लाममध्ये मानले जाते.- डॉ. अब्दूर रेहमान अंजारिया, इस्लाम धर्माचे अभ्यासकसुक्या मेव्याला दरवर्षी रमजानमध्ये मोठी मागणी असते, परंतु बाजारात फळांचा तुटवडा असल्याने, यंदा सुक्या मेव्याची मागणी अधिक आहे. त्यात किंमत कमी असल्याने खजुराची जोरदार विक्री सुरू आहे.- सईद शेख, सुका मेवा विक्रेता