शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

कुटुंबीय लाड करत नसल्याने बारामतीत युवतीची आत्महत्या

By admin | Updated: April 17, 2017 02:47 IST

कुटुंबीय लाड करत नसल्याच्या कारणातून येथील एका महाविद्यालयीन युवतीने रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली

बारामती (पुणे) : कुटुंबीय लाड करत नसल्याच्या कारणातून येथील एका महाविद्यालयीन युवतीने रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. युवतीचे वडील सैन्यात कार्यरत असून ते सिक्कीम येथे हवालदार पदावर कार्यरत आहेत. बारामती ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या उर्फ सायली मानसिंग बळी (१७) ही एमआयडीसीतील सूर्यनगरी येथील सुधांगण बिल्डींगमध्ये भाऊ व आईसोबत राहत होती. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास तिने गावठी कट्ट्यातून कपाळाच्या मध्यभागी एक गोळी मारुन घेतली. ही गोळी तिच्या कपाळातून आरपार जाऊन बाहेर पडली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिची आई भारती यांनी तिला उपचारासाठी रुई रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सायली ही तिची आई व भावासह बारामतीत राहण्यासाठी होती. ती ११ वी उत्तीर्ण झाली आहे. त्यापूर्वी ती पंजाबमध्ये शिकायला होती. आपल्यावर कुटुंबीय प्रेमच करत नाही, माझे लाड केले जात नाही. या नैराश्यातून तिने हे कृत्य केल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत ही बाब उघड झाली आहे. सायलीचे वडील घटनेनंतर बारामतीला येण्यासाठी निघाले आहेत. (प्रतिनिधी)