ऑनलाइन लोकमत
वटार (नाशिक), दि. 11- बागलाण तालुक्यातील पश्चिम पटट्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील बळीराजा सुखावला असून, सुकड़ नाल्यावर बांधण्यात आलेला बंधारा तुटल्याने वटार येथील तलवाड़ा रस्ता पाण्यात वाहून गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला असून लगतचे चार एकर क्षेत्रात पाणी घुसल्याने जमीन पाण्यात वाहून गेले. जमिनीचे वाळवंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बऱ्याच दिवसापासून रुसलेला वरुणराजा परिसरात जोरदार बरसला असून बऱ्याच ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले आहे. रस्ता पाण्यात वाहून गेल्याने एस टी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कपालेश्वर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थांची गैरसोय झाली आहे. परिसरातील नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड़ द्यावे लागत आहे.
अतिवृष्टिमुळे गावात बऱ्याच घरांची पड़झाड़ झाली असून रत्तन वारु गांगुर्डे यांच्या राहत्या घरात पानी घुसल्याने पूर्ण घर पडले सुदैवाने घरातील सर्व मंडली जगी अडल्याने जीवित हानि झाली नाही. घरातील सर्व संसारूपयोगी वस्तु दाबल्या गेल्याने रसत्यावर राहण्याची वेळ आली असून आर्थिक नुकसान साधारणत एक लाखा पर्यन्त झाल आहे. तसेच दादाजी रामा गांगुर्डे व् मांगू सुपदु गांगुर्डे यांच्या घराच्या भिंती पडल्या असून अनुक्रमे दोन्ही घरांचे 15 हजारापर्यन्त नुकसान झाले असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात आले आहेत.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पानी घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माझी सरपंच रामदास दादाजी खैरनार यांचा दीड एकर मका, बारकू गोकुळ खैरनार यांचा एक एकर मका पाण्यात वाहून गेला असून भिका दामू खैरनार आणि कलाबाई भिका खैरनार यांच्या तीन एकर डाळीब बागेत पाणी घुसल्याने काही झाडे वाहून गेले असून बकिचि पडली आहेत. परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरणीच्या कामाणा वेग आला असून परिसरात बळीराजा चांगलाच सुखावला आहे.