शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

लोकांच्या उत्साहाने हिंमत वाढवली : अमीर खान, पाणी फाउंडेशनच्या कामांची सोलापुरात पाहणी

By admin | Updated: April 13, 2017 14:26 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरआप्पासाहेब पाटील - सोलापूरपाणी फाउंडेशनच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या चळवळीत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत आहे़ लोकांच्या उत्साहपूर्ण कामाने हिंमत वाढवली अशी भावना प्रसिध्द अभिनेते आमीर खान व किरण राव यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले़ आमीर खान सोलापूर दौऱ्यावर येणार याची कुणकुण लागली होती़ या पार्श्वभूमीवर लोकमतने सोलापूर विमानतळावर तळ ठोकला होता़ यावेळी धावपट्टीवरच आमीर खान व किरण राव यांना गाठले़ पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात सुरू केलेल्या चळवळीविषयी त्यांना बोलते केले़ मुंबईहून आमीर खान मल्होत्रा कंपनीच्या हेलिकॉप्टरने आले़ आमीर खान हे काळ्या कलरचा टी-शर्ट, काळी पॅन्ट तर किरण राव या नेव्ही ब्ल्यू ड्रेस, गॉगल व पांढऱ्या कलरची ओढणी घातल्या होत्या़ पुढे बोलताना आमीर खान यांनी राज्यात पाणी फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली़ राज्यात सुरू असलेल्या कामाबाबत व लोकांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले़ पाणी फाउंडेशनच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी अभिनेता आमीर खान व त्याची पत्नी किरण राव हे सोलापूर दौऱ्यावर आले होते़ सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले, त्यावेळी त्यांचे स्वागत सोलापूर विमानतळाचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी स्वागत केले़ त्यानंतर थेट आमीर खानने हॉटेल बालाजी सरोवर गाठले़ त्यानंतर त्याठिकाणी थोडी विश्रांती घेऊन ते राळेरास (ता़ बार्शी) याठिकाणच्या कार्यक्रमासाठी पोहोचले़ यावेळी आमीर खान यास पाहण्यासाठी सोलापुरातील चाहत्यांनी हॉटेल बालाजी सरोवरबाहेर गर्दी केली होती़ --------------------------अन् बॅग विमानतळावरच विसरली़़़़पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी अभिनेता आमीर खान व किरण राव हे सोलापूर विमानतळावर आले़ घाई गडबडीत निघालेल्या आमीर खान यांची बॅग विमानतळावरच विसरली़ याबाबत हेलिकॉप्टरचे पायलट यांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ पायलट यांनी पोलिसांच्या मदतीने ती बॅग हॉटेलवर पोहोचवली़ मात्र या घटनेमुळे सुरक्षारक्षक, पाणी फाउंडेशनच्या टीमची चांगलीच धावपळ उडाली़