शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणीसाठे संपल्याने राष्ट्रीय पक्षी मोर अडचणीत

By admin | Updated: May 17, 2016 17:43 IST

पाण्याच्या शोधात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडणारी माणगांव जवळच्या खानजाई मंदिर डोंगर जंगलातील एक लांडोर (मोराची मादी) मंगळवारी पहाटे वाहनांच्या धडकेने गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले.

जयंत धुळप, दि. 17 (अलिबाग)
पाण्याच्या  शोधात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडणारी माणगांव जवळच्या खानजाई मंदिर डोंगर जंगलातील एक लांडोर (मोराची मादी) मंगळवारी पहाटे वाहनांच्या धडकेने गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले असून, या गंभीर जखमी लांडोरीस प्रथम पहाणारे चेतन पाळंदे यांनी तत्काळ महाड तालुक्यांतील बिरवाडी येथील पक्षी-प्राणी मित्र गणराज व डॉ.अर्चना जैन यांच्या सफर प्राणी उपचार केंद्राशी संपर्क साधून गोरेगांव येथील वनरक्षक बाबासाहेब खैरे यांच्या मदतीने सफर प्राणी उपचार केंद्रात दाखल केले आहे.
 
जलदूर्भिक्ष्य आणि वणव्यांच्या भितीने मोर जंगल सोडून येवू लागले गावांत
प्रचंड प्रमाणातील उन्हाळ्य़ामुळे जंगल भागातील नैसर्गीक जलसाठे यंदा पूर्णपणो संपूष्टात आल्याने, गोवा महामार्गाशेजारील डोंगरांवरील जंगलातील मोर मोठय़ा प्रमाणात महामार्ग ओलांतून सावित्री नदी आणि गाववस्ती ठिकाणच्या पाणवठे आणि तळ्य़ावर रात्री पाणी पिण्यासाठी येत असतात. त्याच बरोबर जंगल भागात लावणा:या वा लावण्यात येणा:या वणव्यांमूळे मोर आणि तत्समपक्षी आपला जंगलातील नैसर्गीक अधिवास सोडून गाववस्तीतील पाठवठय़ांकडे येत असल्याचे यंदा पहायला मिळत असल्याचे सफर प्राणी उपचार केंद्राचे प्रमुख गणराज जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 
लांडोरीच्या पाय आणि डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा
गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून मोर आणि लांडोर वाहानांच्या धडकेने जखमी होवून मृत होण्याच्या गेल्या दोन वर्षात एकूण सात घडना घडल्या आहेत. हे प्रमाण गंभीर वाटते. मोर संरक्षणाकरीता विशेष उपाय योजना करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मंगळवारी सफर प्राणी उपचार केंद्रात दाखल ही लांडोर सातवी असून, वाहनाच्या धडकेने तिच्या पाय आणि डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. त्यातून रक्त वाहात असून ही लांडोर रक्ताच्या उलटय़ा करीत आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ.दिलीप सोनावणे या लांडोरीवर उपचार करित असल्याची माहिती सफर केंद्राच्या संचालिका डॉ.अर्चना जैन यांनी सांगीतले.
 
रात्रीच्या वावरामूळे मोरांची नेमकी संख्या सांगणे केवळ अशक्य 
रायगड जिल्ह्यातील जंगल भागात सुमारे तिन हजारच्या आसपास मोर व लांडोर आहेत. मागणाव व गोरेगांव परिसरातील डोगर भागातील जंगलात सुमारे साठ ते सत्तर मोर असल्याची माहिती गोरेगांवचे वनरक्षक भाऊसाहेब खैरे यांनी सांगीतले. मोरांची नेमकी संख्या सांगणो केवळ अशक्य आहे, कारण या मोरांचा सर्वसाधारणपणो रात्री वावर अधिक असतो, दिवसा त्यांचा वावर नसल्याने दरवर्षी होणा:या पक्षी गणनेत मोरांचमोजणी होवू शकत नाही. जंगल भागात राहाणा:या आदिवासी बांधवांकडूनच त्यांची अंदाजे संख्या कळते, असे खैरे यांनी पूढे सांगितले.
 
जंगल भागात अनैसर्गिक तात्पुरते जलपाणवठे गरजेचे
गतवर्षी पक्षी गणना झाली त्यामध्येही मोरांची गणना होवू शकली नाही, यंदा ही पक्षी गणना येत्या 22 मे रोजी होणार असून, पक्षी मित्र संघटनांच्या माध्यमातून यंदा मोरांच्या गणनेचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान अति उन्हाळ्य़ामूळे जंगलात निर्माण झालेल्या जलदूर्भीक्षावर मात करण्याकरीता जंगल भागात अनैसर्गिक तात्पुरते जलपाणवठे निर्माण करण्याची गरज खैरे यांनी अखेरीस व्यक्त केली.