शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अवर्षणामुळे विदर्भातील मासेमारी संकटात

By admin | Updated: December 29, 2015 02:07 IST

अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ.

दादाराव गायकवाड/कारंजा (वाशिम): गत तीन वर्षांपासून अनियमीत आणि अल्प पावसामुळे नद्या आणि जलाशयांमधील जलसाठा कमी होत असल्याने विदर्भातील मासेमारीचा व्यवसाय संकटात सापडला आहे. मासेमारीचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे नदी किंवा तलावात थेट जाळे टाकून मासेमारी करणे, तर दुसरा कंत्राटी पद्धतीने जलप्रकल्पात मत्स्यबीज टाकून त्याचे संगोपन करणे. विदर्भात थेट मासेमारी करणारे दोन समाज आहेत. भोई आणि ढिवर या समाजाची निश्‍चित संख्या देशात उपलब्ध नसली तरी विदर्भात या समाजाची लोकसंख्या जवळपास पाच लाखाच्या घरात आहे. विदर्भातील नद्यांमध्ये सुमारे १५0-२00 प्रजातींचे मासे आढळतात. पूर्वेकडच्या जिल्ह्यांमधील नद्यांमध्ये माशांची विविधता जास्त प्रमाणात बघायला मिळते. विदर्भात आढळणार्‍या दुर्मीळ अशा माशांमध्ये तंबू, कोलशी, खवली, वाडीस, पोडशी, पालोची, बोद इत्यादींचा समावेश होतो. स्थानिक मासेमारांच्या माहीतीनुसार, नदीमधून मासळ्यांच्या अनेक प्रजाती गेल्या काही वर्षांमध्ये लुप्त झालेल्या आहेत. प्रदूषण, मोठी धरणे तसेच पर्यावरणातील बदलामुळे नद्या मृतप्राय होत आहेत. नद्या शहरांचा मैला वाहून नेणारी गटारं बनली असून, याच कारणांमुळे गावरान मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. परिणामी अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. विदर्भाचा प्रदेश हा बृहद पातळीवर गोदावरी आणि तापीच्या खोर्‍यात मोडतो. विदर्भातील वर्धा व वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी असून, त्यांचा उगम महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेश राज्यात आहे. गोदावरी खोर्‍यात वैनगंगा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा आणि इंद्रावती या नद्यांचा, तर तापी खोर्‍यात पूर्णा, मोर्णा, काटेपूर्णा आदी नद्यांचा समावेश होतो. या नद्यांना पाणी नसल्यामुळे थेट मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्‍या भोई आणि ढिवर समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. मासेमारीशिवाय शेतमजुरी करणे हासुद्धा एक पर्याय त्यांच्यासमोर असतो; परंतु दुष्काळामुळे शेती कामेच बंद पडल्याने हा आधारही राहिला नाही.