शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तमाशापंढरीवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: March 7, 2016 02:03 IST

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि तमाशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव तमाशा पंढरीत २७ राहुट्यांनी सजले आहे. तमाशा ठरविण्यासाठी गाव पुढाऱ्यांची रेलचेल सुरू झाली आहे

बुकिंगवर परिणाम : सुपाऱ्या मिळण्याचे प्रमाण घटलेनारायणगाव : महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि तमाशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव तमाशा पंढरीत २७ राहुट्यांनी सजले आहे. तमाशा ठरविण्यासाठी गाव पुढाऱ्यांची रेलचेल सुरू झाली आहे. या वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचे सावट लोकनाट्य तमाशा खेळाच्या बुकिंगवर होणार असल्याने तमाशा फड मालक चिंताग्रस्त आहेत.लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कला पंढरीत तमाशाची सुपारी देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गावातील ग्रामस्थ यांची रेलचेल सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी तमाशा पंढरीत मंगला बनसोडे करवंडीकर, अंजली नाशिककर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, पांडुरंग मुळे, मांजरवाडीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर , हरिभाऊ बढे नगरकर, मालती इनामदार, संभाजी जाधव संक्रापूरकर सह शांताबाई जाधव संक्रापूरकर, संध्या माने सोलापूरकर, लता पुणेकर आनंद लोकनाट्य जळगावकर, मास्टर जगन वेळवंडकर व हौसा वेळवंडकर, दत्ता महाडिक पुणेकर, बाळ आल्हाट नेतवडकर, भिका-भीमा सांगवीकर , सर्जेराव जाधव हावडीकर, नंदाराणी बोकटे, वामनराव पाटोळे मेढापूरकर, मनीषा सिद्धटेककर,आदिला औरंगाबादकर, छाया खिल्लारे बारामतीकर, ईश्वरबापू पिंपरीकर, काळू नामू वेळवंडकर, संगीता महाडिक पुणेकर, प्रकाश आहिरेकर सोबत नीलेशकुमार आहिरेकर, लता पुणेकर, किसन साळवे अहमदाबादकर, लोकनाट्य तमाशा मंडळाच्या राहुट्या या तमाशा पंढरीत उभारल्या आहेत़ तर, काळू-बाळू आणि पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशा राहुट्या लवकरच लागणार आहेत, अशी माहिती नारायणगाव लोकनाट्य तमाशा कलापंढरीचे अध्यक्ष गणपतदादा कोकणे व अन्वरभाई पटेल यांनी दिली़. (वार्ताहर)