शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

हुंडा घेतल्यामुळे नवरीमुलीने मोडले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 19:01 IST

नवरीमुलीने धाडस दाखवत हुंडा घेणाऱ्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 26 - "हुंडा" हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे. हुंडा घेण्याविरोधात आवाज उठला गेला पाहिजे असे आपण बऱ्याचदा म्हणतो, पण तो आमलात आणत नाही, पण ठाणे जवळीत भिंवडीत नवरीमुलीने धाडस दाखवत हुंडा घेणाऱ्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात अशी आपल्याकडे म्हण आहे. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्रच येणे नव्हे तर दोन कुटुंब या नात्याने जोडली जातात. हुंडा देण्याघेण्याच्या प्रथेचे अनेक बळी आजवर महाराष्ट्रानं पाहिले आहेत. त्यातलंच ताजं उदाहरण म्हणजे शीतल वायाळ. शीतलसारखीच परिस्थिती भिवंडीमध्ये एका मुलीवर ओढावली होती. साखरपुडा होऊन तिचं लग्न मोडलं, पण न खचता ती या संकटाला सामोरं गेली.एबीपी माझाच्या वृत्तानुसार, 12 मार्चला ललिताचा साखरपुडा झाला. लग्नाची तारीख ठरली 1 मे. मुलगा एचडीएफसी बँकेत नोकरी करणारा शहापूरचा भास्कर वेखंडे. साड्या खरेदी झाली, मानपानाचे कपडे झाले, मुलाचे कपडे झाले, सोने खरेदी झालीङ्घ इतकंच काय लग्नपत्रिका छापून त्या वाटल्यासुद्धा. पण तितक्यात तिच्या आनंदावर विरजण पडलं. 

(वडिलांच्या झालेल्या अपमानामुळे मंडपातच नवरी मुलीने मोडले लग्न)

ललिताला कॉफीशॉपमध्ये बोलावून भास्करने हुंड्याची मागणी केली. ललिताच्या घरच्यांनी भास्करच्या घरच्यांना समजावण्याच्या प्रयत्न केला. पण ते मानायला तयार नव्हते. अखेर मोठ्या धीरानं ललिताच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पैसा जमवून, कर्ज काढून लग्नाचा खर्च उचलला. त्यावर हुंडा मागणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, असं ललिता निक्षून सांगते.

भिवंडीतल्या कळंबोळी गावात ललिताचे वडिल हे शेतीसोबत प्लंबिंगचं काम करतात. तर ललिता ही मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतेय.