शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

पावसामुळे विजेच्या मागणीत घट, राज्यात भारनियमन नाही, महावितरणचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 6:11 PM

मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे़ राज्यात सोमवारी कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा महावितरणच्या प्रशासनाने केला आहे़ 

ठळक मुद्देकृषीपंपाचे भारनियमन ८ तासांवरअल्पकालीन कराराव्दारे १ हजार ४५० मेगावॅट वीज खरेदीभारनियमन कुठेही करण्यात आले नाही़

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे़ राज्यात सोमवारी कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा महावितरणच्या प्रशासनाने केला आहे़ राज्यात सोमवार ९ आॅक्टोबर रोजी १४ हजार ८०० मेगावॅट एवढी विजेची मागणी होती़ तेवढी वीज महावितरणकडे उपलब्ध असल्याने भारनियमन कुठेही करण्यात आले नाही़ महावितरणच्या प्रशासनाने अल्पकालीन कराराव्दारे १ हजार ४५० मेगावॅट वीज खरेदी केली़ याशिवाय पॉवर एक्सचेंजमधून ६०० मेगावॅट वीज विकत घेण्यात आल्याचे महावितरणने सांगितले़ राज्यातील २ कोटी २० लाख ६६ हजार ३७३ ग्राहकांकडून १७ हजार ९०२ मेगावॅट विजेची मागणी होती़ मात्र राज्याकडे १६ हजार ५५२ मेगावॅट विजेचा पुरवठा होत होता़ दरम्यान, राज्याला १ हजार ३५० मेगावॅट एवढी वीज अपुरी पडत असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून ए, बी़, सी़, डी, ई, एफ, जी १, जी २ आणि जी ३ असे विभाग तयार करून राज्यात सर्वत्र भारनियमन करण्यात आले होते़ --------अशी झाली वीज उपलब्धमहानिर्मिती : ४ हजार ७०० मे़वॅअदानी : २ हजार २०० मे़ वॅरतन इंडिया : ५०० मे़ वॅकेंद्रीय प्रकल्प : ३ हजार ९००जेएसडब्ल्यू : २८० मे़ वॅसीजीपीएल : ५६० मे़ वॅएम्को : ७५ मे़ वॅपवन उर्जेतून : २०० मे़ वॅजलविद्युत प्रकल्पातून : १०० मे़ वॅ---------------कृषीपंपाचे भारनियमन ८ तासांवरराज्यातील वीजपुरवठ्यात अडचणी निर्माण होऊ नये व सुसुत्रता साधण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वाहिनीवरील रात्रीची वीज उपलब्धता ही १७ सप्टेंबर २०१७ पासून १० तासांवरून तात्पुरत्या कालावधीसाठी करण्यात आले आहे़ सध्या राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने चांगले आगमन केल्याने कृषीच्याही वीज मागणीत कमालीची घट झाली आहे़