शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उदासीनतेमुळे वसमत रस्ता ओसाड

By admin | Updated: June 6, 2017 00:09 IST

परभणी : चार वर्षांपूर्वी वसमत रस्त्यावरील मोठी झाडे तोडण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चार वर्षांपूर्वी वसमत रस्त्यावरील मोठी झाडे तोडण्यात आली. अद्यापपर्यंत या रस्त्यावर एकही नवीन झाड न लावल्याने रस्ता ओसाड बनला असून या रस्त्याचे गतवैभव परत येणार का? असा प्रश्न पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.कल्याण- निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून जातो. या रस्त्यावर चार वर्षांपूर्वी जागोजागी मोठी झाडे होती. रस्ता रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली. सुरुवातीला झाडे तोडण्यास विरोध करण्यात आला. परंतु, शहराच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवत महानगरपालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीने काही अटी घालत झाडे तोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर या रस्त्यावरील ७४ झाडे तोडण्यात आली. झाडे तोडण्यापूर्वी दिलेल्या परवानगीनुसार प्राधिकरणाने एका झाडाच्या बदल्यात चार झाडे लावणे अपेक्षित होते. तसेच मोठ्या उंचीची झाडे लावून या झाडांचे एक वर्ष संवर्धन करावे, अशा अटी घातल्या होत्या. मात्र महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर अद्यापपर्यंत एकही झाड लावले नाही. विशेष म्हणजे, चार वर्षांमध्ये किमान चारवेळा वृक्षलागवड मोहिमा झाल्या. या मोहिमेतही वसमत रस्ता वृक्षलागवडीपासून वंचित ठेवण्यात आला. त्यामुळे एकेकाळी दाट झाडी आणि सावली असलेला हा रस्ता आज मात्र ओसाड बनला आहे. त्यामुळे वसमत रस्त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाबरोबरच सर्वसामान्यांनी या रस्त्यावर वृक्ष लागवड करण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.