शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

भेंडी बाजार दुर्घटना : ११७ वर्षे जुनी 6 मजली इमारत कोसळली, उदासीन व्यवस्थेचे पुन्हा 33 बळी, बचावकार्य पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 11:32 IST

मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ११७ वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळल्याने 33 जणांना जीव गमवावा लागला

मुंबई : मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ११७ वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळल्याने 33 जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत बचावकार्य करणा-या ६ कर्मचा-यांसह १९ जण जखमी झाले. उदासीन व्यवस्थेचे ते बळी ठरले. बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एनडीआरएफकडून रात्रभर बचावकार्य सुरु होते. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

इमारतीत तळ मजल्यावर लहान मुलांची नर्सरी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण दहा खोल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत नऊ कुटुंब राहत असून, ६० ते ७० लोक होते. इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव शेजारच्या दोन इमारतींमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे जवान आणि अन्य यंत्रणेने जिकिरीचे प्रयत्न करीत जखमींना सुखरूप बाहेर काढले. म्हाडाने २०११मध्येच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यानंतर ‘सैफी बुºहाणी अपलिफमेंट ट्रस्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’मध्ये होती. २०१६मध्ये इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र रहिवाशांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला होता.धोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करणारइमारत कोसळल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. धोकादायक इमारतीत राहणाºया लोकांना जबरदस्तीने बाहेर काढले जाईल. आता सरकार थांबणार नाही. आठवड्याभरात ही कारवाई करण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी माध्यमांना सांगितले.मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीरसकाळी महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबईशहरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही घटनास्थळी भेट दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले. तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सूचना दिल्या. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दक्षिण मुंबईतील अनेक इमारती धोकादायक असून, त्यांच्या पुनर्विकासातूनच हा प्रश्न सुटू शकतो. सरकार यासाठी प्रयत्नशील आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.जखमींवरजे. जे. आणि सैफीमध्ये उपचारपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जे. जे. हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह ९ जणांना दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्यावेळी अग्निशमन दलाचे पाच आणि एनडीआरएफचा एक असे सहा जवान जखमी झाले असून, दोन जवानांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जवानांना उपचार करून परत पाठवण्यात आले.लहान मुले बचावलीइमारत कोसळलीत्या वेळी इमारतीमधील नर्सरी सुरू असती, तर असंख्य लहान मुले बळी पडली असती, अशी भीती येथील स्थानिक रहिवाशांनी वर्तवली.मृतांची नावेहसन आरसीवाला (४५), तसलीम आरसीवाला (४५), फातिमा सय्यद जाफर (१४), नसीर अहमद (२४), सय्यद जमाल जाफर (१९), बच्चुआ (२२), नसीर गुलाम शेख (२५), सकीना चश्मावाला (५०), कयुम (२५), रईस (५८), रिझवान (२५), मुस्तफा शहा (२२), नसिरुद्दिन अब्बास चश्मावाला (७१), हाफीज मोहसिन शेख (३८), अल्ताफ हैदर मन्सुरी (१२), अब्बास निजामुद्दिन चश्मावाला (४०), अहमदतुल्ला अब्बास चश्मावाला (३), अफजल आलम (२०), रेश्मा जाफर सय्यद (३८), जाफर सय्यद (४०) अशी मृतांची नावे आहेत.

जखमींची नावेतसलीम चश्मावाला, फातिमा उमेदवाला, अब्दुल लतीफ, सईद अहमद, सलीम हुसेन, गुलाम बोरा, इक्बाल खान, सैफुद्दिन कुरेशी, अहमद अली, खान कमरूल हसन, अफजल शेख, रुफीया, जुजन हुसन आरसीवाला.दाऊदची इमारत शेजारीचहुसैनी इमारतीच्या शेजारीच कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीम याची इमारत आहे. या इमारतीमध्ये त्याचा भाऊ इक्बाल कासकर राहतो. दुर्घटना घडली तेव्हा तो घरातच होता. मोठा आवाज झाल्याने तो बाहेर आला. या दुर्घटनेमुळे आमच्या इमारतीलाही हादरा बसल्याचे त्याने माध्यमांना सांगितले.‘मेहता यांनी राजीनामा द्यावा’राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे ही दुर्घटना घडल्याने नैतिकतेच्या आधारे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्टÑवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका