शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस व्हॅनमध्येच प्रसूती

By admin | Updated: December 21, 2015 02:21 IST

पहाटे साडेतीनची वेळ रस्त्यावर शुकशुकाट अवघडलेली स्त्री आणि तिच्यासोबत कुठे, कुणाची मदत मिळतेय का, हे पाहणारी एक वयस्क महिला इतक्यातच, एक पोलीस व्हॅन ‘जीवनदूत’च्या रूपाने त्यांच्याजवळ येऊन थांबते

पुणे : पहाटे साडेतीनची वेळ... रस्त्यावर शुकशुकाट... अवघडलेली स्त्री आणि तिच्यासोबत कुठे, कुणाची मदत मिळतेय का, हे पाहणारी एक वयस्क महिला... इतक्यातच, एक पोलीस व्हॅन ‘जीवनदूत’च्या रूपाने त्यांच्याजवळ येऊन थांबते. अवघडलेल्या स्त्रीच्या वेदना पाहून त्यांना व्हॅनमध्ये घेतले जाते. रुग्णालयाच्या दिशेने प्रवास सुरू होतो... काही वेळातच ती व्हॅनमध्ये प्रसूत होते... आणि त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात सुखरूपपणे पोहोचविण्याचे आगळेवेगळे ‘कर्तव्य’ पोलीस पार पाडतात.पोलीस व्हॅनमध्येच प्रसूती झालेल्या अलका वैभव बालगुडे (२८) हिला पुत्ररत्न झाले असून, दोघांचीही स्थिती उत्तम आहे. घोरपडे पेठेतील महापालिकेच्या उद्यानालगत राहणाऱ्या आपल्या आई माणिकबाई पवार यांच्याकडे बाळंतपणासाठी अलका आली होती. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांना वेदना सुरू झाल्याने, आईने बिबवेवाडी येथे राहणारी मोठी मुलगी शोभा डांगे हिला फोन करून बोलावून घेतले. वेदना असह्य झाल्याने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कडेलाच घर असल्याने, अलका रस्त्यावर येऊन थांबली, तर माणिकबाई यांनी वाहनाची शोधाशोध सुरू केली. इतक्यात, परिसरात गस्त घालत असलेली खडक पोलीस ठाण्याची व्हॅन त्या ठिकाणी आली. अलका यांना प्रसूती वेदना होत असल्याचे पाहून, त्यांना तत्काळ व्हॅनमध्ये घेतले. व्हॅन थोडी पुढे गेलेली असताना त्यांची प्रसूती झाली.हा तर आमचा पुनर्जन्म!पोलीस व्हॅन आली, तेव्हा खूप वेदना होत होत्या. नेमक्या वेळी व्हॅन आल्याने आमचा पुनर्जन्म झाला. पोलीस देवासारखे धावून आले. त्यांनी सहकार्य केले नसते, तर काय झाले असते याचा विचारही करवत नाही, अशी भावना अलका बालगुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.