ऑनलाइन टीमबेळगाव, दि. २५ - महाराष्ट्र राज्य येळ्ळुर असा फलक कर्नाटक जिल्ह्यातील येळ्ळुर या गावी १९५६ पासून होता. न्यायालयाच्या आदेशानंतर तो पोलीस बंदोबस्तात काढण्यात आल्याने सिमावासीय संतप्त झाले असून महाराष्ट्र- कर्नाटक सिमाभागात तणावपूर्ण शांतता आहे. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बसगाड्यांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी मोहन गडद यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देत येथील कोर्टाने बोर्ड हटवण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. या पूर्वी कोर्टाने सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त कोणताही ध्वजलावू नये असा आदेश दिल्यानंतर भगवेझेंडे काढण्यात आले मात्र कर्नाटकचे पिवळे झेंडे मात्र काढण्यात आले नाहीत. येळ्ळुरची जनता या प्रकरणी लढा देील अशई प्रतिक्रीया जेष्ठ शेकपा नेते एन.डी पाटील यांनी दिली आहे.
'महाराष्ट्र राज्य येळ्ळुर' फलक हटवल्याने सिमावासिय संतप्त
By admin | Updated: July 25, 2014 21:59 IST