शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अवयव दान अधुरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 21:25 IST

अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी लातुरातील सह्याद्री रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे कळविला.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि.10 -  अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी लातुरातील सह्याद्री रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे कळविला. मात्र डॉक्टरांनी तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिसाद न दिल्यामुळे अवयव दान होऊ शकले नाही. परिणामी, काही वेळातच बुधवारी सायंकाळी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचे अवयव दान होऊ शकले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कळंब तालुक्यातील मोहा येथील भरत कोंडिबा नागटिळक यांचा रविवारी बार्शी ते कळंब रस्त्यावर अपघात झाला. अपघातानंतर उपचारासाठी त्याला लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे भरत कोंडिबा नागटिळक (वय ३०) यांच्या नातेवाईकांनी उपचार करणारे डॉ. हनुमंत किनीकर यांच्याकडे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त करून निर्णय कळविला. मात्र डॉ. किनीकर यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांनाही अवयव दान करण्यासंदर्भात कळविले. मात्र या यंत्रणेचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भरत नागटिळक यांचे चुलत भाऊ नारायण नागटिळक यांनी थेट निवासी उपजिल्हाधिकारी नारायणराव उबाळे यांच्याशी संपर्क साधून अवयव दान करण्याला डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कळविले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी उबाळे यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. मात्र तोपर्यंत भरतचा सायंकाळी मृत्यू झाला अन् नातेवाईकांनी व्यक्त केलेली अवयव दानची इच्छा अधुरी राहिली, असा आरोप नारायण नागटिळक यांनी केला आहे. प्रोसीजर केली; नातेवाईकांचा आरोप असमजातून...नातेवाईकांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही तात्काळ शासकीय रुग्णालयाला कळविले. परंतु, अवयव दान करण्यासाठी बीपी १०० च्या पुढे असणे आवश्यक आहे, आॅक्सिजन, पल्सही नियमानुसार असणे आवश्यक आहे. ते अवयव दान करण्याच्या नियमात बसत नव्हते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णाचे अवयव घेता आले नाहीत. नातेवाईकांचा आरोप असमजातून आहे. डोळे तेवढे दान करता येतील, असे नातेवाईकांना कळविले असल्याचे डॉ. हनुमंत किनीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.