शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: July 8, 2017 04:43 IST

वांद्रे येथील बेहराम पाड्यातील ७२ इंच व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. या जलवाहिनीच्या वाहणाऱ्या पाण्याने दोन सख्ख्या भावंडांचे

मुंबई : वांद्रे येथील बेहराम पाड्यातील ७२ इंच व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. या जलवाहिनीच्या वाहणाऱ्या पाण्याने दोन सख्ख्या भावंडांचे प्राण घेतले. या घटनेनंतर परिसरात काही वेळासाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घरांमध्ये पाणी शिरल्याने जवळपास पन्नास कुटुंबे बेघर झाली आहेत.या घटनेनंतर जलवाहिनीलगतच्या दोन्ही बाजूंकडील झोपड्यांवर आॅक्टोबर महिन्यात कारवाई केली जाईल आणि जलवाहिन्या संरक्षित केल्या जातील, असे एच/ईस्टच्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बेहरामपाड्यामध्ये इंदिरानगर जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे स्थानिकांनी घराबाहेर पडून नेमका प्रकार काय, हे पाहण्याआधीच पाण्याचा मोठा लोट त्यांच्या घरात शिरला. या ठिकाणी असलेल्या ७२ इंच व्यासाच्या जलवाहिनीचे झाकण उडाले आणि मधोमध ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या जलवाहिनीतून बाहेर येऊ लागले. नेमक्या काही अंतरावर असलेल्या झोपडीत प्रियांका डोईफोडे (९) ही मुलगी तिच्या आठ महिन्यांच्या भावाला खेळवत होती. हे दोघे अतिवेगवान पाण्यात वाहून गेले. ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, दोघांना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. प्रियांकाला व्ही.एन. देसाई तर स्वप्निलला भाभा रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारचा दिवस असल्याने मुस्लीम बांधवांचा नमाज या ठिकाणी अदा केला जातो. बेघर झाल्याने रस्त्यावर आलेली कुटुंबे, साचलेले पाणी आणि त्यातच वाहनांमुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली.लेकरांची माय बेशुद्ध पडलीपाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोटच्या पोरांची अवस्था आईला सहन न झाल्याने ती जागीच बेशुद्ध झाली.महापालिका अधिकारी दोन तास उशिरा पोहोचले!वांद्रे परिसरात इतकी मोठी घटना घडली तरी जवळपास दोन तास महापालिकेचा एकही अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केल्याचे एका खासगी संस्थेचे प्रमुख नामदेव गुल्दगड यांनी सांगितले. त्यांनी स्थानिकांसाठी जुने कपडे तसेच खाण्यापिण्याच्या सामानाची व्यवस्था केली.