शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 28, 2016 02:43 IST

शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली.

ठाणे : शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली. ठाणे शहरात सोमवारी दिवसभरात ८० मिमीच्या आसपास पावसाची नोंद झाली. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. ब्रह्मांड येथे पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून ८ गाड्यांचे नुकसान झाले. तर, पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या २४ तासांत विक्र मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. विशेष म्हणजे धरण क्षेत्रातही पाऊस बरसण्यास सुरुवात झाल्याने आता समाधान व्यक्त होत आहे. या पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळीत झाली होती. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल उशिराने धावत होत्या. लांबलेल्या पावसाने शुक्रवारी जिल्ह्यात आगमन केले. त्यानंतर, सलग तीन दिवस पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पडझडीच्या घटना घडल्या. ठाण्याच्या आपत्कालीन कक्षाकडे सोमवारी सुमारे २८ तक्र ारींची नोंद झाली. त्यामध्ये शॉर्टसर्किट १, झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या ९, पाणी तुंबण्याची १, भिंत कोसळण्याची एक अशा तक्र ारींचा समावेश होता. ब्रह्मांड येथे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भिंतीलगतच्या २ कार आणि ६ दुचाकींचे नुकसान झाले. तर, कोपरी येथील रतन सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील गांगुर्डे यांच्या घराचे छत कोसळले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुरबाड, शहापूर, कल्याण तालुक्यांमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मुरबाड-शहापुरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भातसा धरण क्षेत्रामध्ये दिवसभरात ४०, मोडकसागर धरण क्षेत्रात ३१.४०, तानसा धरण क्षेत्रात ३१.४० आणि बारवी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत २४ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या २४ तासांत विक्र मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत डहाणूमध्ये २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १० वर्षांत डहाणू शहरात झालेला हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. पालघर जिल्ह्यात जूनच्या सुरु वातीला दडी मारून बसलेल्या वरु णराजाने महिन्याच्या अखेरीला जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्यानाल्यांची पाणीपातळी वाढली असून बळीराजा सुखावला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी योग्य नियोजनाअभावी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वरुणराजाने रंग दाखवताच प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलेले रस्ते, वीज आणि नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. पहिल्याच पावसात काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी विजेचा सततचा लपंडाव सुरू असून चहूकडे पाणीचपाणी झाले आहे.>उल्हासनगरात ३ दिवसांत १८ झाडे पडलीउल्हासनगर शहरातील जनजीवन संततधार पावसाने विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांत १८ पेक्षा जास्त झाडे कोसळली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यावर झाड पडल्याने पोलीस ठाण्याचे पत्रे फुटून विद्युतपुरवठा खंडित झाला होता. तर, सखल भागांत पाणी साचण्याचे प्रकार घडले.उल्हासनगरातील मार्केट परिसरात स्मशानशांतता पसरली आहे. गुलशननगर, साईनाथ कॉलनी, राधास्वामी सत्संग, कल्याण-अंबरनाथ रस्ता, आयटीआयसमोर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.गेल्या २४ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित झाला असून सार्वजनिक विभागाने दुरुस्ती काम सुरू केले आहे. उभ्या असलेल्या ४ ते ५ मोटारसायकलींवर झाड पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. शहरातील नाले तुंबून शहरात पाणी साचल्याच्या घटना घडल्या नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली.अंबरनाथ-बदलापूरला दमदार हजेरीअंबरनाथ : अंबरनाथ-बदलापूर परिसरांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले. यात शालेय विद्यार्थ्यांचे जास्त हाल झाले.वाहतूककोंडीने कल्याण-डोंबिवलीकर हैराण : कल्याण - संततधार पावसाने सोमवारी चौथ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीला झोडपले. यामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले असून अनेक ठिकाणी नाले तुंबले आहेत. विजेच्या लपंडावाने शहरवासी हैराण झाले आहेत. शहरातील शीळफाटा रोड, मानपाडा रोड, अंबरनाथ रोडवर वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांचे हाल झाले. कल्याण बस आगारात पावसाचे पाणी साचले असून त्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याशिवाय रामबाग, मानपाडा रोडसह अनेक गावठाणांत कचरा वेळेत उचलला न गेल्याने संताप व्यक्त होत आहे.