ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - दिवाळीच्या सुट्ट्या संपवून कामावर निघालेल्या चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे. कसा-याच्या दिशेने निघालेल्या मालगाडीचे इंजिन आसनगावजवळ बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
सोमवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास कल्याणहून निघालेल्या मालगाडीचे इंजिन आसनगावजवळ बंद पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून त्याचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकूवर झाला असून लोकलची वाहतूक खोळबंली आहे. हा तांत्रिक बिघाड दुरूस्त होण्यास आणखी काही अवधी लागणार असल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.