शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या परीक्षांमुळे शिक्षकांना निवडणुकीच्या कामाचा बोजा कमी

By admin | Updated: December 22, 2016 04:22 IST

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवेळीच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असणार आहेत. त्यामुळे

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवेळीच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असणार आहेत. त्यामुळे खासगी शाळांतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर लावल्यास त्याचा परिणाम हा परीक्षांवर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना सूट मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. खासगी शाळांमधील शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी शिक्षक परिषदेला दिले. निवडणुकांमध्ये शिक्षक नेहमीच सहभागी होतात, पण त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होणार आहेत. तर त्याचवेळी दहावीच्या प्रात्यक्षिक आणि भाषेच्या तोंडी परीक्षा सुरू असणार आहेत. या काळात शाळेतील बहुतांश शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला पाठवल्यास परीक्षा घेणे, दुसरे वर्ग चालवणे हे शाळेला कठीण जाते.केंद्र, राज्य आणि सार्वजनिक उपक्रम, महानगरपालिका आणि अन्य आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे तीन लाखांच्या घरात आहे. तरीही अनेकदा खासगी अनुदानित शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर जुंपण्यात येते हे निदर्शनास आणून दिले. एका शाळेतील बहुतांश शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी घेतात. असे करण्यात येऊ नये. गरज पडल्यास शाळेतील १५ ते २० टक्के शिक्षकांनाच कामासाठी घ्यावे, अशी मागणी केल्याचे शिक्षक परिषदेच्या मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देऊन परीक्षांचे व शाळेचे नुकसान होणार नाही तसेच शाळेतील संपूर्ण कर्मचारी न घेता कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याचेही बोरनारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)