शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शाहीमार्ग बदलल्याने साधूंचे दर्शन दुर्लभ

By admin | Updated: August 30, 2015 02:51 IST

गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात दुसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी शाही मार्गावरील सरदार चौकात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने ३० हून अधिक भाविकांचा बळी गेला होता.

पंचवटी : गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात दुसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी शाही मार्गावरील सरदार चौकात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने ३० हून अधिक भाविकांचा बळी गेला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी साधू-महंत व प्रशासनाने शाही मार्गात बदल केल्याने शनिवारी झालेल्या पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी जुन्या शाही मार्गावरील भाविकांना साधू-महंतांचे दर्शन दुर्लभ झाले. तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराकडून सुरू झालेली शाही मिरवणूक दिगंबर आखाडा व पुढे पारंपरिक मार्गाने पंचमुखी हनुमान मंदिराकडून काट्या मारुती, लक्ष्मण झुलाकडून न नेता यावेळी श्रीराम सार्वजनिक वाचनालय गणेशवाडीतून पुढे गाडगेमहाराज पुलाखालच्या रस्त्याने रामकुंडापर्यंत नेण्यात आली. पूर्वीच्या शाही मार्गावरील काट्या मारुती, लक्ष्मण झुला, श्री काळाराम मंदिर उत्तर दरवाजा, सरदार चौक या रस्त्याने शाही मिरवणूक गेलीच नाही. शिवाय रामकुंडाकडे जाणारे सर्वच रस्ते बंद केल्याने व नागरिकांना प्रवेश नसल्याने यंदा कुंभमेळ्यात जुन्या शाहीमार्गावर राहणाऱ्या भाविकांना साधू-महंतांचे दर्शन दुर्लभ झाले. पोलीस नागरिकांना घराबाहेरही थांबू देत नसल्याने घरातच बसावे लागल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. सिंहस्थ शाही मिरवणुकीच्या मार्गात बदल केल्याने ज्या भागातून पहिल्यांदाच मिरवणूक गेली त्या भागातील नागरिकांनी साधू-महंतांच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती आणि पहिल्यांदाच मिरवणूक जवळून बघायला मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला, तर दुसरीकडे जुन्या शाही मार्गावरील नागरिकांना शाही मिरवणूक तर सोडा, परंतु रामकुंडावर स्नान केल्यानंतर पुन्हा तपोवन साधुग्रामकडे जाणारे साधू-महंतही बघणे अवघड झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर) निर्वाणी अनी आखाड्याचे साधू-महंत शाहीस्नान आटोपून परतीच्या मार्गाला लागले होते. खालशांची वाहने एकापाठोपाठ एक चालली होती. तेवढ्यात पुढची दोन वाहने अचानक थांबली. त्यांपैकी एका वाहनावर संतप्त झालेले एक साधूमहाशय हातातील काठी आदळत गाडी थांबवण्याची सूचना करीत होते. क्षणभर काय झाले, हे कोणालाच कळले नाही. पोलीसही चक्रावून पाहू लागले. नंतर मात्र निर्वाणी आखाड्याचे श्री महंत धरमदासजी यांचा रथ मागे राहिल्याने साधू संतप्त झाल्याचे स्पष्ट झाले. हा रथ पुढे गेल्यानंतरच अन्य वाहने रवाना झाली.