शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्या बंदीमुळे १९७ कोटींचा चारा हवा !

By admin | Updated: March 5, 2015 01:59 IST

कत्तलखान्यात वर्षाकाठी जाणारी तीन लाख जनावरे जगविण्यासाठी साधारणपणे १९७ कोटींचा चारा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असणार आहे.

सुधीर लंके - पुणेगोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीनंतरच्या वाढीव खर्चाचा आढावा घेण्याचे काम पशुसंवर्धन विभागाने सुरू केले असून, कत्तलखान्यात वर्षाकाठी जाणारी तीन लाख जनावरे जगविण्यासाठी साधारणपणे १९७ कोटींचा चारा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असणार आहे.सध्या गायींची कत्तल करण्यास बंदी होती. इतर गायवर्गीय जनावरांच्या हत्येवर मात्र बंदी नव्हती. पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१३-१४ या आर्थिक वर्षात ३ लाख १६ हजार बैल व वळू कत्तलखान्यात गेले. दरवर्षी सरासरी तीन लाख गायवर्गीय जनावरे कत्तलखान्यात जातात. शेतकरी साधारणत: निरुपयोगी जनावरांची विक्री करतात.गोहत्याबंदीमुळे ही जनावरे जगविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येणार आहे. त्यांचा चारा, पाणी, निवाऱ्यावरील खर्च वाढणार आहे. जनावराला दररोज सहा किलोचा वाळलेला चारा लागतो. तीन लाख जनावरांसाठी वर्षाकाठी ६ लाख ५७ हजार मेट्रीक टन म्हणजे सुमारे १९७ कोटींचा चारा लागणार आहे.वर्षाकाठी लाळखुरकुताची लस दोनदा द्यावी लागते. एका लसीला सहा रुपये प्रमाणे वर्षाकाठी हा खर्च ३६ लाखांच्या घरात जाईल. जनावरे जगविण्याची सक्ती झाल्याने शेतकऱ्यांना मदत करावी लागेल, असा मतप्रवाह सरकारमध्ये आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयाने उपाययोजनांचा अहवाल यापूर्वीच मंत्रालयाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. च्पांजरापोळ गोरक्षण संस्थांना सरकारकडून अनुदान द्यावे लागेल. शेतकरी त्यांच्या जनावरांना तेथे पाठवू शकतात.च्चारा पिकांसाठी बियाणे पुरविण्याचा प्रस्तावच्जनावरे जगविण्यासाठी पडीक जमीन विकास कार्यक्रम हाती घेण्याचा पर्याय उपलब्ध२०१२ च्या पशुगणनेनुसार राज्यात एकूण १ कोटी ५४ लाख गायवर्गीय जनावरे आहेत. बैल- ७२ लाख २३ हजारगाई - ८२ लाख ६१ हजार