शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डीजे बंदीमुळे पारंपरिक वाद्यांना सुगीचे दिवस

By admin | Updated: April 29, 2016 02:11 IST

डीजे वाजविण्यास बंदी घातल्याने वधू-वरांच्या लग्नात आता सर्रास बँड पथक, बँजो पार्टी, पारंपरिक वाद्ये वाजू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) ग्रामसभेत गावात लग्ने व वरातीत डीजे वाजविण्यास बंदी घातल्याने वधू-वरांच्या लग्नात आता सर्रास बँड पथक, बँजो पार्टी, पारंपरिक वाद्ये वाजू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात तीन ते चार डीजे आहेत. तालुक्यात एकूण अंदाजे १०० ते १५० डीजे असल्याने लग्न वरातीत सर्रास डीजेचा वापर होतो. ज्याच्या डीजेचा आवाज मोठा त्याच्या डीजेला मागणी जास्त. डीजेच्या आवाजामुळे ज्यांना हृदयरोगाचा आजार आहे, अशा लोकांच्या छातीत दुखणे, ० ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे कान बहिरे होणे, मांडणीची भांडी जमिनीवर पडणे, डॉक्टरांच्या कपाटातील औषधांच्या बाटल्या खाली पडणे हे प्रकार अनेक वर्षे चालू होते. याला गावठाणातील रहिवासी कंटाळले होते. वरातीत डीजे, बिर्याणी, दारू असल्यामुळे तरुण नाचायला येतात, नाही तर कोणी नवरदेवाला विचारत नाही. काही लोक लग्न सामुदायिक सोहळ्यात करतात, मात्र हेच नवरदेव रात्रीच्या वेळी वरातीसाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च करतात. (वार्ताहर)विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अवसरी खुर्द हे गाव आमदार आदर्श योजनेत घेतल्याने गावामध्ये डीजे दारूधंदे बंद करण्याचा निर्णय ग्रामपांयतीच्या वतीने ग्रामसभेत घेतला. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत मंचर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात डीजे, अवैध दारूधंदे बंद झाले. मंचर पोलीस ठाण्याला मोठ्या प्रमाणात डीजे, अवैध दारूधंद्यांकडून हप्ते मिळत असल्याने रात्रीच्या वेळी छोट्या आवाजात डीजे चालू आहेत, तर अवैध दारू व्यवसायसुद्धा चालू असल्याचे पाहावयास मिळत आहे.